हिमायतनगर प्रतिनिधी /- हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांची हिमायतनगर शहरातील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र वानखेडे व सर्व भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न झाली या सभेला लाडक्या बहिणीसह नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देत हजारोच्या संख्येने उपस्थित दाखवली होति त्यामुळे उपस्थित मतदारांना आव्हान करताना खासदार अशोकराव चव्हाण यांनी असे सांगितले की विकसित हिमायतनगरच्या विकासासाठी स्वच्छ निर्मळ प्रतिमेचा उमेदवार म्हणून डॉक्टर राजेंद्र वानखेडे यांना निवडून द्या मी शहराचा विकास करून देईल अशी आम्ही त्यांनी यावेळी बोलताना दिली....
याबाबत सविस्तर वृत्त असे कि महाराष्ट्राचे भाग्यविधाते तथा मराठवाड्याचे भूमिपुत्र नांदेड जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते खासदार अशोकराव चव्हाण यांनी आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी हिमायतनगर शहरातील नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र वानखेडे यांच्या प्रचारार्थ शहरात जाहीर सभेचे आयोजन केले होते या सभेला मार्गदर्शन करताना खासदार अशोकराव चव्हाण यांनी लाडक्या बहिणीसह मतदारांना आवाहन केले की स्वछ प्रतिमेचा उमेदवार तुमच्या समोर उभा आहे माय बाप मतदारांनी मला मतदान केल असे समजून हिमायतनगरच्या सर्वांगीण विकासासाठी स्वच्छ व निर्मळ प्रतिमेचा उमेदवार राजेंद्र वानखेडे यांना तुम्ही भरघोस मतदान देऊन निवडून द्या कुठल्याही भूलथापाला बळी न पडता भारतीय जनता पार्टीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना प्रचंड असा आशीर्वाद देऊन येत्या दोन डिसेंबर रोजी मतदान करा असे आव्हान त्यांनी यावेळी केले व विरोधकांचा कुठलाही समाचार त्यांनी यावेळी घेतला नाही उलट विरोधकांना माझ्यावर टीका केल्याशिवाय झोप येत नाही या भाषेत त्यांनी खोचक उत्तर देत देत भारतीय जनता पार्टी ही एक देशातील सर्वात एक नंबरची व विकास करणारी पार्टी आहे देशासह महाराष्ट्राच्या विकासात भारतीय जनता पार्टीचे मोठे योगदान आहे त्यामुळे हिमायतनगरच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी डॉक्टर राजेंद्र वानखेडे यांनाच निवडून द्या अशी विनंती केली व या कार्यक्रमादरम्यान मागील तीस वर्षापासून शिवसेनेत असलेले निष्ठावंत कार्यकर्ते विलास वानखेडे यांच्या सह असंख्य कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवसेनेला जय महाराष्ट्र करून भाजपा प्रवेश केला
यावेळी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष किशोरजी देशमुख, डॉक्टर अंकुश देवसरकर,गिरीश जाधव, भंडारे सर, निवडणूक प्रभारी डॉक्टर सात डोंगरगावकर, हदगाव तालुका अध्यक्ष भागवत देवसरकर, हिमायतनगर तालुका अध्यक्ष गजानन चायल, किशोर रायेवार,गजानन तुप्तेवार, कल्याण सिंग ठाकूर, विपुल दंडेवाड, सोशल मीडिया जिल्हा संयोजक नागेश शिंदे, आशिष सकवान,सुधाकर पाटील, यलप्पा गुंडेवार, सह भारतीय जनता पार्टीचे असंख्य नेते व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
