हिमायतनगर प्रतिनिधी/- शहरातील मतदार जागृक असुन विधानसभा निवडणुकीत देखील मला मताधिक्याने विजयी केले त्याच पद्धतीने या नगरपंचायत निवडणुकीत देखील नगराध्यक्ष नगरसेवकांना मताधिक्याने विजयी करतील आणि या नगरपंचायत वर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला जाईल असे आवाहन केले आहे तसेच महायुती करतो म्हणून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आम्हाला दगा दिला असल्याचा आरोप बाबुराव कदम कोहळीकर यांनी शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ केले आहे.
हिमायतनगर शहरातील नगरपंचायत निवडणुक लागली असुन प्रचाराला देखील सुरूवात झाली आहे.शनिवारी शिंदे शिवसेना गटाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रामभाऊ ठाकरे व नगरसेवकांच्या प्रचाराचा नारळ श्री परमेश्वर मंदिरात फोडण्यात आला व परमेश्वर दर्शन घेऊन आ.बाबुराव कदम कोहळीकर, जिल्हाध्यक्ष विवेक देशमुख यांच्या उपस्थितीत शहरातील मुख्य रस्त्याने भव्य काढण्यात आली.या दरम्यान पत्रकारांशी बोलताना आ.कोहळीकर म्हणाले की हिमायतनगर शहरातील विकासासाठी कटीबद्ध असुन या शहरातील मतदारांच्या विश्वासाला जपणारा मी आहे .
गेल्या निवडणुकीत या नगरपंचायत मध्ये कांग्रेस पक्षाची सत्ता होती त्यांनी विकास तर सोडा शहराची वाट लावली आहे आणि आतातर कांग्रेस नेते कोणत्याही पदावर नाहीत त्यामुळे विकासाचे खोटं आश्वासन जनतेला देऊन फसवणूक करू नये येथील मतदार सुज्ञ असुन या निवडणुकीत नगरपंचायत वर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला जाणार असल्याचे आ.बाबुराव कदम कोहळीकर यांनी बोलताना सांगितले आहे.या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रामभाऊ ठाकरे, उपजिल्हा प्रमुख राजू पाटील भोयर, विजय वळसे पाटील,विकास पाटील देवसरकर, अन्वरखान पठाण,शहराध्यक्ष गजानन हारडपकर , नाथा पाटील चव्हाण,सदाशिव सातव,संतोष कदम,दिलीप ढोणे,यांच्यासह शहरातील शिवसेनेचे सर्व उमेदवार कार्यकर्ते पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महायुतीमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी दगा दिला
महायुती होणार हे सत्य होते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी तसे बोलले देखील परंतु ऐनवेळी भाजपाच्या उमेदवारांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली आणि हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत महायुती होण्यामध्ये मध्ये दगा दिला मात्र आमचा गेल्या तिस वर्षांपासून शिवसेनेचे काम करणारा कार्यकर्ता रामभाऊ ठाकरे यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली आणि ते जनतेच्या मनातील उमेदवार आहेत शंभर टक्के निवडुन येतील परंतु माजी मुख्यमंत्री यांच्यावर विश्वास केला आणि त्यांनी दगा दिला असल्याचा आरोप आ.बाबुराव कदम कोहळीकर यांनी केला आहे.
