डॉ.राजेंद्र वानखेडे यांच्या पक्षप्रवेशाने भाजपाला बळ नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता

हिमायतनगर प्रतिनिधी/- हिमायतनगर शहरातील डॉ. राजेंद्र वानखेडे यांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी भाजपामध्ये पक्ष प्रवेश घेतला आहे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी हिमायतनगर शहराचा कायापालट करण्यासाठी भाजपा ताब्यात द्या अशी घोषणा हिमायत्नागिरीतील भेटीदरम्यान केली होती त्यानंतर त्यांनी लक्ष शहराकडे केले आणि हिमायतनगर शहरातील एक नवीन चेहरा डॉक्टर राजेंद्र वानखेडे यांना भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे त्यामुळे हिमायतनगर शहरात भाजपाला बळ मिळाले असून येणाऱ्या निवडणुकीत काय चित्र घडणार हे पाहणे देखील उत्सुकतेची ठरणार आहे .

हिमायतनगर शहरांमध्ये गेल्या नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाची सत्ता होती.परंतू या नगरपंचायत निवडणुकीत चित्र काही वेगळेच असणार आहे.

 या निवडणुकीमध्ये चौरंगी लढत होण्याची शक्यता असल्यामुळे या ठिकाणी भाजपा भाजपाकडून उमेदवार शोध मोहीम सुरू असतानाच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हिमायतनगर येथील डॉक्टर राजेंद्र वानखेडे यांना भाजपा प्रवेश घेण्याच्या सूचना केल्या होत्या शहरातील सर्वांगीण विकासासाठी भाजपा प्रवेश करा शहराला निधी देण्याची हमी देतो असे आश्वासन देत डॉक्टर वानखेडे यांचा पक्षप्रवेश केला असल्याचे वानखेडे यांनी सांगितले. नगरपंचायत निवडणुकीत महायुतीकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देखील देण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

डॉक्टर राजेंद्र वानखेडे यांनी शहरासह तालुक्यातील गोरगरिबांना वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून सेवा केली त्यामुळे ते सर्व दूर परिचित आहेत परंतु ते पहिल्यांदा निवडणुक रिंगणात उतरणार असल्याने मतदारांचा निर्णय काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून.शहराच्या सर्वांगीण विकासाचे आपले ध्येय असुन त्यासाठी प्रवेश घेतला असल्याचे बोलतांना सांगितले आहे. डॉ राजेंंद्र वानखेडे यांचा शहरात प्रवेश होताच भाजपाच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले व सत्कार करण्यात आला यावेळी भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.