हिमायतनगर प्रतिनिधी/- येथील नगरपंचायत निवडणूकीने शहरातील वातावरण गरम होताना दिसत असून सर्वच राजकीय पक्षांची मोठ्या प्रमाणात निवडणुकीची जोमाने तयारी सुरू झाली असल्याचे चित्र आहे.आजी -,माजी आमदार खासदार देखील या निवडणुकीसाठी मोठ्या फिल्डिंग लावण्यात व्यस्त आहेत .
येथील नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी एकूण आठ उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल केली आहे तर नगरसेवक पदासाठी 102 नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल केली आहेत . सातव्या दिवशी रविवारी एकूण 110 नामनिर्देशन दाखल झाले असल्याची माहिती दिली आहे.सोमवार सेवठचा दिवस असुन सर्वच पक्षांतील इच्छुकांची गर्दी होणार आहे कोणत्या वार्डातुन कोण फायनल हे मात्र अद्यापही कळाले नाही आज मोठे शक्ती प्रदर्शन करीत राजकीय नेते नामनिर्देशन करणार असल्याची माहिती आहे.
हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीमध्ये एकूण 17 वार्ड असून अठरावा उमेदवार हा नगराध्यक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहे तर 17 वार्डामध्ये नगरसेवक पदाचे उमेदवार असणार आहेत या 17 वार्डासाठी आजपर्यंत नगरसेवक पदासाठी 102 उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल केले आहेत .
दिनांक 16 नोव्हेंबर रोजी निवडणूक विभागाकडे एकूण 54 उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल केले आहेत.तर एका नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन दाखल झाले आहे असे मिळून आज पर्यंत सातव्या दिवशी 110 उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल केले असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून मिळाली आहे.
नामनिर्देशन दाखल करण्यासाठी सोमवार हा आखेरचा दिवस दिवस शिल्लक असुन अनेक उमेदवार वाजत गाजत शक्ती प्रदर्शन दाखवत उमेदवारी नामनिर्देशन दाखल करणार असल्याची माहिती आहे .
येथील नगरपंचायत निवडणूकीत काँग्रेस,शिवसेना उबाठा,राष्ट्रवादी, शिंदे शिवसेना, भाजपा मोठ्या ताकदीने लढणार असल्याचे चित्र आहे. हिमायतनगर नगरपंचायत प्रथमच तिरंगी लढत होणार आहे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जनतेच्या संपर्कात असेल तरच मतदार देखील पसंती देणार आहेत आजपर्यंत मतदारांना कधी भेटला नाही अशा उमेदवारांना निवडणुकीत मतदार जागा दाखवतील असे बोलताना सांगत आहेत.निवडणुकीच्या तोंडावर आश्वासन देणाऱ्यांना मात्र निवडणूक अवघड जाणार असल्याची शक्यता आहे.
