हिमायतनगर फर्टीलायझर्स संघटनेकडून पुरग्रस्तांना आर्थिक मदत... तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्याकडून सामाजिक कार्याचे कौतुक

हिमायतनगर प्रतिनिधी( श्रीनिवास बोंपीलवार)
 महाराष्ट्र राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पुरप्रस्थीती निर्माण झाली यामध्ये अनेक नागरीकांसह शेतकऱ्यांना जिव गमवावा लागला तरा अनेकांनी पुराच्या पाण्यामुळे इतरत्र हलविण्यात आले होते त्या आपत्ती ग्रस्तांना मदतीचा हात म्हणून हिमायतनगर तालुका सिडस् फर्टिलायझर्स अॅन्ड पेस्टीसाईडस् डिलर्स असोसिएशन च्या वतीने निधी शासनाच्या खात्यात जमा करण्यात आला असुन याची प्रत तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्याकडे सुपूर्द केले आहे.
            
हिमायतनगर तालुका सिडस् फर्टिलायझर्स अॅन्ड पेस्टीसाईडस् डिलर्स असोसिएशन, हिमायतनगर कडुन पुरग्रस्तांना आर्थीक मदत म्हणुन आ असोसिएशन कडुन पुस्ग्रस्तांना आर्थीक मदत म्हणुन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणे बाबत खाते क्रमांक 
क्रं. 10972433751 स्टेट बँक ऑफ इंडिया, मेन ब्राँच मुंबई ह्या खात्यामध्ये रक्कम रुपये 83,200/- अक्षरी त्र्यांशी हजार दोनशे रुपये जमा केली आहे.या धनादेश ची प्रत मदतीचे निवेदन तहसीलदार यांच्याकडे संघटनेच्या वतीने सूपुर्द करण्यात आले यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष रमेश पळशीकर, उपाध्यक्ष मारोती पाटील लुम्दे,सचीव अमोल बंडेवार , शाम ढगे, राजदत्त सुर्यवंशी,अनिकेत दमकोंडवार,दिलीप गुडेटवार, नागोराव काईतवाड, गजानन टोपलवाड, अवधूत कल्याणकर, रामेश्वर पाकलवाड, गणेश पाळजकर, यांच्यासह कृषी व्यापारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.