हदगाव तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीवर भाजपाचा झेंडा फडकवणार - खा. अशोकराव चव्हाण

हिमायतनगर प्रतिनिधी / हदगाव/हिमायतनगर विधानसभेत नव्याने काम करणारे तरुण नेतृत्व पुढे येत आहे. भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवायची असेल तर तरुण नेतृत्वाला संधी देऊन यावेळी नवी क्रांती घडवून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकवणार आहे,असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी वाळकी येथील भारतीय जनता पार्टी हदगाव पूर्व मंडळाचे तालुकाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी आयोजित केलेल्या कार्यकर्ता पदाधिकारी मेळाव्यात बोलताना आपले मत व्यक्त केले.
यावेळी मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून उमरखेडचे आमदार किसनराव वानखेडे किनवटचे आमदार भीमराव के राम माजी आमदार तथा शहर जिल्हाध्यक्ष अमरनाथ राजूरकर नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय लहानकर किशोर स्वामी रामचंद्र मुसळे जगदीश पाटील भोशीकर,प्रा.राजीव सूर्यवंशी,शेखर पाटील कोळीकर, हदगाव पश्चिम मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत हनवते बाला पाटील माजी तालुकाध्यक्ष तातेराव वाकोडे, गजानन चायल बाळू भाऊ देशमुख आयोजक तथा भाजपचे तालुकाध्यक्ष भागवत देवसरकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

पुढे बोलताना अशोकराव चव्हाण म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सर्वांगीण विकासाची घोडदौड जोरदार चालू असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी साठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन करीत निवडणुकीचे रणसिंग फुंकले,आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर हदगांव तालुक्यातील आष्टी जिल्हा परिषद गटातील वाळकी बुद्रुक येथे भाजपाचे तालुका अध्यक्ष भागवत देवसरकर यांनी कार्यकर्ता मेळाव्याचे सुंदर आयोजन केले होते,यावेळी किनवटचे आमदार भिमराव केराम, माजी आमदार अमरनाथ राजुरकर, उमरखेडचे आमदार किशनराव वानखेडे, सभापती संजय देशमुख लहानकर, जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख रामचंद्र मुसळे, शेखर पाटील कोळीकर शशिकांत बंडावर शंकर जगदाळे प्रा.डॉ.राजीव सूर्यवंशी यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.
किनवट माहुर, हदगांव/हिमायतनगर विधानसभा क्षेत्राच्या दौ-यावर असलेले खा. अशोकराव चव्हाण यांनी आगामी काळातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकीच्या अणुषंगाने कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यात उत्साह निर्माण करण्यासाठी झंजावती दौरा केला. पुढे बोलतांना खासदार अशोकराव चव्हाण म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रसरकार व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबवत आहेत. शेतकरी कामगार गरजवंतासह समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाच्या दृष्टीने अनेक योजना पोहोचवण्याचे काम सुरळीत चालू आहे. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांचे मदत पॅकेज असो, अनुकंपाधारकाचे प्रश्न असो की, केंद्र सरकारने जीएसटी दरांमध्ये केलेला बदल असो सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या ठरल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भाने बोलताना खासदार अशोक चव्हाण म्हणाले यावेळी हदगाव हिमायतनगर तालुक्यात भागवत देवसरकर यांच्यासारखे उत्कृष्ट काम करणारे तरुण नेतृत्व पुढे येत आहे. नेतृत्वाला संधी देऊन आपणाला नवीन क्रांती घडवायची आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती बरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकवायचा आहे त्यासाठी त्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसून कामाला लागले पाहिजे. बऱ्याच वक्त्यांनी सांगितले की, अशोक चव्हाण यांचे हदगाव तालुक्याकडे दुर्लक्ष होत आहे. पण यावेळी मी हदगाव तालुक्यासाठी निश्चित वेळ देणार आहे. हदगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी बार बार हदगावला येणार. पण मला हदगावला येण्यासारखे काही करून दाखवा. मी निश्चित येणार असे उद्गार काढताच उपस्थित आतून जल्लोष पूर्ण टाळ्यांचा कडकडाट झाला. जनतेमध्ये राहणा- या त्यांचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांला आपण यावेळी निश्चित संधी देऊ. हदगाव तालुक्यात तालुकाध्यक्ष भागवत देवसरकर यांचे चांगले काम चालू आहे. आष्टी जिल्हा परिषद गटातील वाळकी बुद्रुक सारख्या छोट्या गावामध्ये रात्री उशिरापर्यंत मोठाजनसमुदाय थांबलेला पाहून समाधान व्यक्त करीत आगामी जिल्हा परिषदसाठी देवसरकरांना ग्रीन सिग्नल दिला.

    आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र भाजपचा बोलबाला झाला पाहिजे यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण यांच्या उपस्थितीत वाळकी बुद्रुक येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले. मेळाव्याच्या अनुषंगाने सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी एक भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आपण अनेक विकासाची कामे करण्याचा प्रयत्न करीत आहोत. यापुढेही करणार असल्याचे आणि राज्यात नवे नेतृत्व आणि क्रांती घडवून आणणाऱ्या चव्हाण साहेबांचे आशीर्वाद हदगाव तालुक्यावर असावेत. एवढाच माफक प्रयत्न असल्याचे भाजपाचे तालुकाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी आपल्या प्रास्ताविकात मनोदय व्यक्त केला, कार्यक्रमाला रात्री उशीर होऊन हजारो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची गर्दी होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओम इंदेवार देवानंद वानखेडे स्वप्निल रामगिरवार शशिकांत बंडावर शेख रहीम अविनाश कदम ,प्रवीण जाधव राजेंद्र मोरे भीमराव पाटील चव्हाण, अरविंद हुंडेकर गजानन चव्हाण शंकर जगदाळे बालाजी मेटेवाड, सुनील पाटील वाळकीकर, विशाल परभणकर योगेश चव्हाण शिवराज वारकड, संगपाल लोणे,धनराज सोनटक्के,संजय सोमेवाड,प्रकाश आडे सतीश डोणगे यांच्यासह भारतीय जनता पार्टी हदगाव पूर्व मंडळातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बुथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख कार्यकर्ते वाळकी बुद्रुक येथील ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.