खा. नागेश पाटील आष्टीकर यांची रेल्वे कामावर अचानक भेट हिमायतनगर रेल्वे स्थानकाच्या कामातील उणिवा उघड





हिमायतनगर प्रतिनिधी /हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी हिमायतनगर रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या अमृत भारत योजनेतील तब्बल 42 कोटी रुपयांच्या कामाची बुधवार दिनांक 01 ऑकटोबर रोजी अचानक भेट देऊन पाहणी केली. रेल्वे स्थानकाच्या कामात थातूरमातूर व अंदाजपत्रकातील गंभीर अनियमितता होत असल्याचे वृत्त दैनिक पुण्यनगरी मध्ये प्रकाशित करण्यात आले होते त्यानंतर खासदार यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली काम गुणवत्ता आणि दर्जेदार झाले पाहिजे अन्यथा एजन्सी धारकांची गय केली जाणार नाही असा इशारा दिला खासदार यांनी थेट पाहणी केली असता अनेक कामावरील उणीवा उघड झाल्या आहेत.


हिमायतनगर रेल्वे स्थानकाला भेट देऊन पाहणीत केली असता दोन वर्षांपूर्वी करण्यात आलेले सिमेंट काँक्रीट फोडून पुन्हा निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे. लोखंडी गजाळी व साहित्यात कमी दर्जा दिसून आला. कोरोना काळापासून सुरू असलेले शेडचे काम अद्याप अपूर्ण असून, इमारतींचे नूतनीकरण फक्त जुनी भिंत लपवून बाजूला आडोसा म्हणून नवीन भिंत बांधून रंगरंगोटीच्या स्वरूपात आणले जात आहे. अभियंता व सुपरवायझर यांना विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देता आली नसल्याने हि मुद्दे उघड झाले आहेत. अंदाजपत्रकाला बगल देऊन ठेकेदाराकडून निधी लाटण्याचा प्रकार होत असल्याची शंका उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

तसेच नागरिकांनी सांगितले कि, पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी बोअर मारणे आवश्यक, पार्सल ऑफिस, सिनियर सिटीझन कन्सीशन (हाफ तिकीट) लॉक डाऊन पासून बंद करण्यात आले ते चालू करणे. जनरल सुलभ शौचालय, अलाऊन्सिंगमध्ये तफावत अंडी कोणता डब्बा कुठे येते याची माहिती मिळत नाही. तसेच प्रवाश्याना हव्या त्या सुविधा मिळत नसल्याचे आणि पोलीस चौकी नसल्याने चोरीचे प्रमाण वाढले असल्याचे नागरिकांनी सांगितले.
 
खासदारांचे आश्वासन
नागरिकांच्या तक्रारी व समस्या ऐकल्यानन्तर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी सांगितले की, ते लवकरच नांदेड डिव्हिजनच्या विभागीय व्यवस्थापकांशी चर्चा करून या कामाची सविस्तर माहिती घेणार आहेत. तसेच अंदाजपत्रकाप्रमाणे गुणवत्तापूर्ण व सर्व सोयीसुविधायुक्त काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी प्रवासी नागरिकांना आश्वासन दिले.

नागरिक व कार्यकर्त्यांची नाराजी
पाहणीदरम्यान नागरिकांनी स्थानकावरील कामाबाबत तक्रारी केल्या. "जुन्या इमारतीला फक्त रंगरंगोटी करून नूतनीकरण दाखवून निधी गिळंकृत केला जातोय का?" असा सवालही उपस्थित झाला. यावेळी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रवासी नागरिक, स्टेशन मास्तर, ठेकेदाराचे सुपरवायझर-इंजिनिअर व पत्रकार उपस्थित होते. खासदारांच्या भेटीनंतर कामाच्या गुणवत्तेत सुधारणा होऊन हिमायतनगर रेल्वे स्थानकाचे काम लवकर पूर्ण होईल, अशी अपेक्षा नागरिकांत व्यक्त होत आहे.यावेळी शिवसेनेचे विठ्ठल ठाकरे,तालुका प्रमुख संजय काईतवाड, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, अरविंद पाटील, दत्तात्रय तिम्मापुरे, यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.