हिमायतनगर प्रतिनिधी / हिमायतनगर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद तर चार पंचायत समिती गण व गटाचे आरक्षण सोडत सोमवारी जाहीर करण्यात अली असून या आरक्षण सोडतीमुळे अनेक इच्छुकांचे स्वप्न भंगले असून कभी खुशी कभी गमचे चित्र राजकीय गटात निर्माण झाले आहे .
हिमायतनगर तालुक्यातील सरसम जिला परिषद हा गट अनुसूचित जमाती तर पोट बु .(कामारी) हा जिला परिषद हा गट सर्वसाधारण करीता राखीव झाला आहे या प्रकारे दोन जिल्हा परिषद चे आरक्षण जाहीर झाले आहे जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी अनेक दिवसापासून
तयारी करणाऱ्या इच्छुकांची संधी हुकली असल्यामुळे अनेकांचे स्वप्न भंगले आहे .
तर पंचायत समिती सभापती करीता अनुसूचित जाती साठी आरक्षित असल्यामुळे सभापती पदासाठी अनेकजण इच्छुक होते.हिमायतनगर तालुक्यात सोमवारी पंचाइत समिती च्या चार गणासाठी आरक्षण सोडत झाली आहे यामध्ये कामारी पंचाईत समिती अनुसूचित जाती महिला करीता सुटले आहे.
तर पोट बु. हा गण नागरिकांचा मागास वर्ग प्रवग करीता आहे तर सरसम हा गण अनुसूचित जमाती महिला आहे .सिरंजनी हा गण सर्वसाधारण करीता आरक्षीत झाला आहे.
अशा पद्धतीने दोन जिल्हा परिषद आणि चार पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत जाहीर झाली असून या निवणुकीची वाट गेल्या चार ते पाच वर्षांपासून राजकीय इच्छुक पाहत होते.
या जिल्हा परिषद पंचायत समिती तयारी करणाऱ्या इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. अनेक इच्छुकांच्या मनाजोगे गटातील आरक्षण जाहीर झाले नसल्यामुळे कही खुशी कही गम पहावयास मिळाली आहे असे असले तरी तर या आरक्षणामुळे हिमायतनगर जिल्हा परिषदेसह पंचायत समितीवर महिला राज येणार हे मात्र निश्चित झले आहे .

