हिमायतनगर प्रतिनिधी/- हिमायतनगर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पहिल्याच अतिवृष्टीने बांध फुटून अतोनात नुकसान झाले होते त्यानंतर पुन्हा संत सुधार झालेल्या पावसाने शेतात उभे असलेल्या सोयाबीनला देखील आता कोंब फुटू लागले असून शेतकऱ्यांची अधिकच वाढली असुन पिकांच्या अशा अवस्थेमुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे .हिमायतनगर तालुक्यात शेतकऱ्यांना पिकांचा शंभर टक्के फटका बसला असून प्रशासनाने शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अशी मागणी होत आहे.
हिमायतनगर तालुक्यात यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून शेतकऱ्यांच्या मागे निसर्गाचा कोप दिसत असून पेरणी केल्यानंतर सोयाबीन उगवलेच नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची वेळ आली होती त्यानंतर कशीबशी पेरणी झाली का बस सोयाबीन पीक उगवले होते परंतु ऑगस्ट महिन्यापासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे खरडून पूर्ण जमिनी खरडलेल्या असल्यामुळे शेतातील पिके उध्वस्त झाल्याचे चित्र होते.
त्यानंतर सप्टेंबर महिन्यात देखील मुसळधार पावसाची रिपीरिप सुरूच ठेवली असल्यामुळे या महिन्यात देखील काढणीला आलेले सोयाबीनला देखील आता सततच्या पावसामुळे कोंब फुटत असल्यामुळे काढणीला आलेले सोयाबीन जाण्याची वेळ आली असल्यामुळे अशी विदारक परिस्थिती पाहून शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.
तसेच शेतात काही असलेल्या कापसाच्या झाडांना देखील प्रमाणात बोंडे उगवले होते ते बोंडे देखील या पावसाने गळून पडत असून काळवट पडली आहेत त्यामुळे सोयाबीनच्या शेंगा काळवटल्या आहेत तर कापसाचे बोडांची देखील तीच अवस्था निर्माण झाली असल्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठी चिंता लागली आहे.शासनाकडून शेतकऱ्यांना तुटपूंजी मदत जाहीर करण्यात आली आहे परंतु त्या मदतीतून शेतकरी सावरणार नाही अशी भयानक परिस्थिती या तालुक्यात झालेली आहे. त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजाराची मदत देण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यातून होत आहे.
