इसापूर धरनाचे पाण्यामुळे शेती पाण्याखाली कोठा येथील शेतकऱ्यांची आत्महत्या... अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना धक्का

हिमायतनगर प्रतिनिधी/- हिमायतनगर तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील जमिनी खरडून गेल्या त्यानंतर थोडेफार शेतकऱ्यांचे उभे पिकं होते पैनगंगा नदी ला इसापूर धरनाचे दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले यामुळे होते ते पिक या पाण्यात गेले असल्याने कोठा येथील शेतकऱ्यांनी सोमवारी सायंकाळी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.


हिमायतनगर तालुक्यातील कोठा येथील शेतकरी अशोक विठ्ठल दवणे यांच्या शेतातील अतिवृष्टीमुळे व धरणनाच्या अतिरिक्त पाणि नदी मध्ये सोडल्यामुळे पूर्ण शेतामध्ये तळ्याचे स्वरूप निर्माण झाले आहे.यामुळे शेतातील गाळ व शेतीतील पाईप वाहून गेले, इतर शेती अवजारे साहित्य वाहून गेले आहे .शंभर टक्के पिक गेले आता बियाणासाठी झालेला खर्च कोठून द्यावा शेतातील पिके काडीमोड झाली आहेत याचा मनाला ध्यास ठेवून शेतकऱ्यांनी चिंताग्रस्त होऊन आपली जिवनयात्रा संपविल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे.कोठा गाव नदी काठावर असुन यामुळे संपूर्ण शेत शिवार पाण्याखाली गेला असुन इसापूर धरनाचे दरवाजे उघडले असुन पाणी नदी पात्रात सोडले असल्याने या शेतकऱ्यांच्या शेतात तळ्याचे स्वरूप झाले होते ते पिक पाण्याखाली गेले असल्याने विवंचनेत राहून आत्महत्या केल्याची माहिती पोलीस पाटील गौतम दवणे यांनी दिली आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.