हिमायतनगर प्रतिनिधी/ रामराज्यात राजा देव आणि प्रजाही देवच, अशी भावनात्मक समता आहे. प्रजा व राजा दोघेही समान आहेत अशी राज्यकर्त्यांची व समाजाची धारणा होती आणि ही राज्यव्यवस्था खर्या अर्थी प्रजानुकूल आदर्श राज्यव्यवस्था होती
संतांच्या अंतरंग एकरूपतेचा धागा सकलांनी लक्षात घेतला पाहिजे
व्यापक तत्त्व सर्वांनीच उमजून घेतले पाहिजे व भेदभावाचा क्षुद्र विचारविचार टाकून रामभक्ती-विठ्ठलभक्ती अधिष्ठित सामाजिक एकता-एकोप्याला प्राधान्य दिले पाहिजे असा उपदेश ह.भ.प.चंद्रकांत महाराज लाटकर यांनी किर्तन सेवत केला आहे.
हिमायतनगर तालुक्यातील कारला येथील हनुमान मंदीराच्या सुरू असलेल्या अखंड सप्ताह गुरूवार च्या किर्तन सेवेत ह.भ.प.चंद्रकांत महाराज लाठकर भाविकांना उपदेश करतात पुढे म्हणाले की राम म्हणता रामचि होईजे ह्या चरणातुन उपस्थित भाविकांना उपदेश केला पुढे म्हणाले की परमार्थ करीत असतांना आपला गुरु महत्त्वाचा आहे , जिवनात आपल्यावर संस्कार महत्त्वाचे असुन आपल्या लेकरांवर संस्कार करायचे तर प्रथमता आई वडिलांनी संत गाथा ज्ञानेश्वरी पारायण, रामकथा,भागवत कथा वाचली पाहिजे श्रवण केली तर याच परमार्थातून संस्कारित पिढी घडल्याशिवाय राहणार नाही म्हणून रामाचे गुण अगांत घ्या
धर्मे तत्परता बाळगा, माणसाने धर्माला सोडून वागू नये
धर्मवीर होणे सोपे धर्माचं पालन करणं अवघड आहे.त्यासाठी मुखातील वाणी मधूर ठेवा संतांच्या संगतीत राहून आपल्या धर्मातील संस्कार जतन करा भविष्यातील पिढ्यांचा उद्धार करण्यासाठी हरिनाम सप्ताह सुरू ठेवा राम नाम जपाने, चिंतनाने साधकाचा व्यक्तिविकास होतो म्हणून प्रत्येक मणूष्याने राम नामाचा जप शेवटच्या श्वासापर्यंत घेतला पाहिजे असे महाराज यांनी सांगितले या किर्तन सोहळ्यात तबलावादक सचिन बोंपीलवार, मृदंगाचार्य प्रथमेश एटलेवाड,पेटीची साथ नामदेव बोंपीलवार,गायण भगवान गुंफलवाड , कोंडबा ताडकुले,नाथा चव्हाण, कृष्णा बोंपीलवार,आनंद सुर्यवंशी, रामदास बोंपीलवार,केशव रासमवाड,राजेश ढाणके, महेश ताडकुले,व्यंकटराव चेपूरवार,आडेलू चपलवाड,माधव मिराशे, लक्ष्मण चितलवाड, मारोती पाटील,गजानन मिराशे,बाळू रासमवाड, वसंत मिराशे,अमोल एटलेवाड, ग्यानबा इटेवाड, राजेश रासमवाड, शंकर मोरे, रामराव पाटील यांच्यासह भाविकांची उपस्थिती होती.
