गुढीपाडव्याला कारला येथे अखंड हरिनाम सप्ताह संगीतमय भागवत कथेला होणार प्रारंभ

हिमायतनगर प्रतिनिधी/ गेल्या दहा वर्षांपासून गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मौजे कारला (पी.) येथे अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व संगीतमय भागवत कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमीत्त सात दिवस दररोज रात्री हरिकिर्तन व जागर भजनाचा संगीतमय भागवत कथा होणार असुन या भक्तीमय सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

       हिमायतनगर तालुक्यातील कारला येथील हनुमान मंदिराचा अखंड हरिनाम सप्ताह व संगीत भागवत कथेचे
 आयोजन करण्यात आले असुन या सोहळ्याला गुढीपाडव्याच्या दिवशी दि.30 मार्च पासून प्रारंभ होणार असुन 6 एप्रिल रोजी सांगता होणार आहे.अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा
व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सप्ताहीतील दैनंदिन कार्यक्रम रूपरेषा श्रीमद भागवत कथा दुपारी १ ते ४,काकडा भजन सकाळी ५ ते ६ ,ज्ञानेश्वरी पारायण सकाळी ७ ते १०,हरिकिर्तन | रात्री ८.३० ते १०.३०,हरिजागर रात्रभर,हरिपाठ सायंकाळी ५.३० ते ७ ज्ञानेश्वरी पारायण व्यासपिठ ह.भ.प. शिवाजी महाराज वडगांवकर
श्रीमद भागवत कथा व्यासपिठ ह.भ.प. भागवताचार्या कु. वैष्णवीदीदी गौड सोनखेडकर आणि संच ,किर्तन व हरिपाठ :- गायनाचार्य ह.भ.प. निळकंठ बिंगेवाड, ह.भ.प. नारायण ताडकुले, ह.भ.प. निवृत्ती महाराज खुणे, ह.भ.प. बालाजी महाराज कोरेवाड, ह.भ.प. भगवानराव गुंफलवाड, दररोज हरीकीर्तन ,ह.भ.प. बालकिर्तनकार भक्तीताई धानोरकर,ह.भ.प. पुरूषोत्तम महाराज इंगोले पोफाळी,ह.भ.प. पंजाब महाराज चालगणीकर,ह.भ.प. अशोक महाराज तळणीकर,ह.भ.प.चंद्रकांत महाराज लाठकर,ह.भ.प. श्यासुंदर गिरी महाराज आष्टीकर,ह.भ.प. पंढरीनाथ महाराज नांदेडकर यांचे होणार असुन सांगता ह.भ.प. पंढरीनाथ महाराज नांदेडकर यांच्या काल्याच्या किर्तनाने होणार आहे. सप्ताहातील उपस्थित गुणीजन मंडळी काकड़ा संच हार्मोनियम ह.भ.प. रामदास महाराज बोंपिलवार, गायनाचार्य ह.भ.प. शिवाजी भंडारे बिटरगांवकर, ह.भ.प. कोंडबा ताडकुले वडगांवकर, ह.भ.प. अशोक बोपिंलवार, अशोक चप्पलवाड, रामराव लुम्दे,मृदंगाचार्य : ह.भ.प.प्रथमेश यटलेवाड, तबला वादक रामराव पाटील लुम्दे, ह.भ.प.हर्ष बालाजीराव मिराशे, ह.भ.प. बाल कलाकार अदित्य कोरेवाड. * विणेकरी:- माधव मिराशे, दत्तराव चिंतलवाड. चोपदार ह.भ.प. माधव महाराज गारशेटवाड हे असणार आहेत.काल्याच्या किर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप होणार असुन बजरंग दल च्या पदाधिकाऱ्यांकडून आठ दिवस सप्ताहामध्ये सेवा करण्यात येणार आहे .या अखंड हरिनाम सप्ताह व संगीत भागवत कथेचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन कारला ग्रामस्थांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.