हिमायतनगर येथे बुधवारी संत फुलाजी बाबा यांच्या अध्यात्मिक सत्संग सोहळ्याचे आयोजन

हिमायतनगर प्रतिनिधी/महान सद्‌गुरू श्री श्री श्री संत फुलाजी बाबांचे अमृततुल्य प्रवचन व अध्यात्मिक सत्संग सोळ्याचे आयोजन हिमायतनगर येथे बुधवारी आयोजित केला आहे. पंचक्रोशीतील सद्भक्तांनी सत्संग सोहळ्याचा आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

      हिमायतनगर शहरातील बोरगडी रस्त्यावर असलेल्या सिध्देश्वर संस्थान ध्यान केंद्र येथे बुधवारी दुपारी 12 वाजता अध्यात्मिक सत्संग सोहळा होणार आहे. सिध्देश्वर योग्यपिठ संस्थान समिती, पटनापूर चे अध्यक्ष केशव फुलाजी इंगळे यांच्या हस्ते सकाळी ग्रंथ पुजन व ध्वजारोहण होणार आहे.संत फुलाजी बाबा यांचे सूपूत्र गौरव अध्यक्ष, सिध्देश्वर योग्यपिठ संस्थान समितीचे वामन इंगळे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व उपस्थित भाविकांना अमृततुल्य मार्गदर्शन प्रवचन करण्यात येणार आहे.संगीत भजनी मंडळ, चिचोंर्डी, महादापूर, भिश्याचीवाडी, वडाचीवाडी येथील असणार आहे.या अध्यात्मिक सत्संग सोहळ्यासाठी वाशी, मुरझळा, नखात्याचीवाडी, तळ्याचीवाडी, महादापूर, चिचोंर्डी, वडाचीवाडी, वाळकेवाडी, पोटा (बु.) दाबदरी, सरसम, पवना, कोत्तलवाडी, एकघरी, पार्डी, बान्हाळी तांडा, दगडवाडी, वायवाडी, दरेसरसम, जिरोणा, रमणवाडी, गणेशवाडी, पिंचोडी, सवना, वडगांव, खैरगांव, सिबदरा येथील मंडळी व्यवस्थापन करणार आहे.या अध्यात्मिक सत्संग सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.