हिमायतनगर प्रतिनिधी/ एपिएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी २०२३ पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी रु. १५०/- इतक्या रकमेच्या थेट हस्तांतरणाची (Direct Benefit Transfer- DBT) योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली असून त्यासाठी हिमायतनगर तालुक्यातील एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारकांनी शिधापत्रिकेची छायांकीत प्रती सोबत कुटुंब प्रमुखाचे बैंक खाते क्रमांक कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्डची छायांकीत प्रत तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडे सादर लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी केले आहे
महाराष्ट्र शासन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण विभाग यांचे शासन निर्णयान्वये, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत सामाविष्ट न झालेल्या एपिएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी २०२३ पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी रु. १५०/- इतक्या रकमेच्या थेट हस्तांतरणाची (Direct Benefit Transfer- DBT) योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच प्रतिवर्षी किमान आधारभुत किंमतीत होणा-या वाढिनूसार केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या Cash Transfer of Food Subsidy Rules, 2015 मधील तरतुदीनुसार प्रतिमाह प्रतिलाभार्थी सुधारित वादिव रोख रकंकम (पुढिल दशकाच्या पूर्णाकात) थेट हस्तांतरीत करण्यात मान्यता देण्यात आली आहे.
हिमायतनगर तालुक्यातील शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभर्थ्यांना तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी तालुका प्रशासनाद्वारे आव्हान केले आहे.माहे जानेवारी २०२३ पासून शेतकरी शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती दरमहा रुः १५०/- प्रमाणे APL DBT योजने अंतर्गत अनुदान मिळाले नसतील अशा शेतकरी शिधापत्रिकाधारक लाभार्थी यांनी सदर योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आपल्या शिधापत्रिकेची छायांकीत प्रती सोबत कुटुंब प्रमुखाचे बैंक खाते क्रमांक कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्डची छायांकीत प्रत व ७/१२ उता-याची छायांकीत प्रती सोबत आपला अर्ज संबंधीत रास्तभाव दुकानदारा मार्फत अथवा स्वतः तहसिल कार्यालय हिमायतनगर, येथिल पुरवठा विभागात येऊन त्वरीत सादर करावा असे आवाहन केले आहे.
