जवळगावकरांच्या समाज कार्यामुळे स्व.पंजाबरावाच्या नावाची ज्योत कायम आहे - ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज

हिमायतनगर प्रतिनिधी/ जन्माला आलेला माणसाचं मृत्यू अटळ आहे. जवळगावकर परिवाराचे विस टक्के राजकारण आणि अंशी टक्के समाज कारण हे घराण्याचे वैशिष्ट्य असुन समाजाला घेऊन चालतांना आजघडीला सर्वत्र सख्या भाव भावातील वाद दररोज ऐकायला मिळतात भाऊ गेल्यानंतर गेल्या 24 वर्षांपासून भांवाची पुण्यतिथीनिमित्त अखंडपणे सुरू ठेवणारा भाऊ माजी आ.माधवराव जवळगावकर यांच्या रूपाने मिळाला असे भाऊ देखील असणं हे भाग्य असत प्रत्येक भावाने जवळगावकरांचा आदर्श घेऊन आपला भाऊ काय असतो हे जाणल पाहिजे जवळगावकरांनी केलेल्या समाज कारणांमुळे स्व.पंजाबरावांच्या नावाची आजही कायम तेवत ठेवली असल्याचे ह.भ.प.ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज बुलढाणेकर यांनी किर्तनसेवेतून केला.              

        हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव कै पंजाबराव पाटील जवळगावकर यांच्या पुण्यतिथी निमित्त २० डिसेंबर रोजी ह भ प पुरुषोत्तम बुलढाणेकर महाराज यांच्या किर्तनसेवेचे आयोजन केले होते.प्रथमता स्व.पंजाबराव पाटील यांच्या समाधीस्थळी पुजन करून अभिवादन केले. किर्तन सोहळ्यात पुरूषोत्तम महाराज यांचा माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी सत्कार केला.या किर्तन सोहळ्यात हजारो भाविक उपस्थिती होते.एक वेळा करी या दुखा वेगळे,दुरीताचे जाळे ऊगवुनी.आणवुन पाय हा माझा नवस,रात्र ही दिवस पांडुरंगा: या राष्ट्रसंत तुकाराम महाराजांच्या अभंगावर किर्तन करतांना पुरूषोत्तम महाराज म्हणाले की नाही.आयुष्यात सुखी समाधानी जीवन जगण्यासाठी देवांचे चिंतन करावा.कै निवृतीराव पाटील यांनी देखील जिल्हा परिषद उपाध्यक्ष, आमदार हे पद सांभाळताना आयुष्यभर साधी राहणी उच्च विचारसरणी कायम ठेवली.कै.पजाबराव पाटील जवळगावकर यांनी देखील आपल्या आयुष्यात समाजासाठी स्वताला झोकून दिल्यामुळेच आजही त्यांचे कार्य जीवंत असल्याचा हा ऊपस्थीताची संख्या सांगत आहे. वडीलासह भावांचा आदर्श घेऊन माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी आपल्या जीवनात कधीही अहंकार न करता समाजाची बांधीलकी जपून समाजातील गोरगरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जवळगावकर यांनी समाजाशी एकनिष्ठ पणे राहुन कार्य चालुच ठेवावे भविष्यात मोठी संधी मिळणार असल्याचे ह .भ. प. पुरुषोत्तम महाराज बुलढाणेकर यांनी व्यक्त केले. या किर्तन सोहळ्यात हदगाव हिमायतनगर तालुक्यातील भाविकांसह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती विशेष म्हणजे केदारगुडा,दत्तबर्डी, पिंपळगाव, ऊखळाई आश्नमचे बापु,शिवपुरी, आष्टी,पाथरड येथील संत, महंतासह भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.