शिक्षणातून कु.अनुजा मादसवार यांनी ध्येय गाठून आई वडिलांचे स्वप्न साकार केलेे - माजी आ.जवळगावकर

हिमायतनगर प्रतिनिधी/ हिमायतनगर येथील आदिनाथ मादसवार या़ची कन्या कु.अनुजा आदिनाथ मादसवार मृद जलसंधारण अधिकारी गट (ब.) म्हणून निवड झाली असुन निवडीबद्दल तिच्या सत्कार प्रसंगी माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर म्हणाले की आजच्या घडीला शिक्षण क्षेत्रात मुली यशस्वी होत असुन अनुजा मादसवार चा आदर्श घेऊन शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक मुलींनी प्रयत्न करून शिक्षणातुन आई वडिलांचे स्वप्न साकार केले पाहिजे असे आवाहन केले आहे.
नायगाव तालुक्यातील घुगंराळा येथे कु .अनुजा मादसवार सध्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर कार्यरत असुन या पदावरून मृद व जलसंधारण अधिकारी म्हणून निवड झाली आहे.निवडीबद्दल हिमायतनगर येथील कांलीका मंदिर सभागृहात सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.अनुजा मादसवार सारख्या मुलींनी शिक्षणात भरारी घेऊन मोठ्या पदावर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे कष्टकरून शिक्षण देणारे आई वडिलांचे स्वप्न साकार केले पाहिजे अनुजा मादसवार यांनी उच्च शिक्षण घेऊन आपल्ये ध्येय गाठले आहे तिचा आदर्श शिक्षण क्षेत्रातील मुलींनी घेतला पाहिजे असे आवाहन माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी सत्कार प्रसंगी व्यक्त केले .यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड, सभापती जनार्दन ताडेवाड, माजी सभापती परमेश्वर गोपतवाड, शहराध्यक्ष संजय माने,राजीव रामदीनवार , नारायण गुंडेवार ,, सुनंदा मादसवार, रामकृष्ण मादसवार, नारायण आवदुतवार, संदीप तुप्तेवार,
नागेश दासेवार, चंद्रकलाबाई गुडेटवार, योगेश चिलकावार, गणेश राहुलवाड, शिक्षीका शारदा आवदुतवार, दत्तात्रय तिमापुरे,उतम मिराशे, राजु जैस्वाल,पापा पार्डीकर,पंढीत ढोणे,
,यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.