कामारी येथील तरुण शेतकऱ्यांनी दोन एकरात घेतले 140 टन उसाचे उत्पन्न शेतकऱ्यांचा ग्रामस्थांनी केला सन्मान

हिमायतनगर प्रतिनिधी/(सोपान बोंपीलवार)
शेती करण्यासाठी अनेकांचा हिरमोड असतो उत्पन्न वाढत नाही दरवर्षी उत्पादन घटत चालले आहे त्यामुळे अनेक तरुण शेतकरी शेती करण्यापासून दुरावतात परंतु कामारी येथील तरूण शेतकऱ्यांनी एका वर्षात दोन एकरात 140 टन उसाचे उत्पन्न घेतले असल्याने त्यांचा शेतकऱ्यांनी सत्कार केला व तरुण शेतकऱ्यांनी प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले.
         हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती उत्पादन घेण्यासाठी कुठल्याही प्रकारची सिंचनाची व्यवस्था नाही खरिप रब्बी हंगाम कसा बसा पावसाळ्यातील पाणी झाले त्यावरच उरकावा लागतो पैनगंगा नदी काठच्या शेतकऱ्यांना उसाचे पिक घेण्यासाठी डिसेंबर अखेरपर्यंत पाणी मिळते त्यानंतर पैनगंगा नदी पात्र देखील कोरडेठाक होते.
 यामुळे या भागातील शेतकऱ्यांना शेती करणे अवघड आहे.याही परिस्थिती काही शेतरकी अतिशय मेहनत घेऊन उत्पादन घेण्यासाठी रात्रंदिवस एक करून विहीर,तलाव ,नदीचा पाणी पुरवठा करतात.त्याच माध्यमातून शेती उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करतात असाच कामारी येथील शेतकऱ्यांचा मुलगा भगवान रामराव शिरफुले यांनी गेल्या वर्षभरात दोन एकर मध्ये उसाचे 140 टन विक्रमी उत्पादन काढले आहे.या तरुण शेतकऱ्यांनी आपल्या मेहनतीने शेती कमी दिवसांत जास्त उत्पादन  मिळवले असल्याबद्दल शेतकरी भगवान शिरफूले यांचा सन्मान माजी जिल्हा परिषद सदस्य जोगेंद्र नरवाडे, प्रमोद शिरफुले, सुनिल शिरफुले,यांनी सत्कार केला आहे ‌.यावेळी भगवान शिरफूले म्हणाले की शेतकरी मित्रांनो एकमेकांना शेती क्षेत्रात मदत करत चला अनुभव सांगत चला सकारात्मक विचारातून शेती केल्यास उत्साह वाढत असतो. शेतकरी मित्रांनो या सन्मानापेक्षा शेतीमध्ये पुढील प्रयोग करण्यासाठी ही एक उर्जा असुन प्रयत्न केल्यास यश मिळते त्यासाठी मेहनत घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.