हिमायतनगर प्रतिनिधी/ मतदारसंघातील सर्व जाती धर्मांना घेऊन प्रलंबित कामांना प्राधान्य देणार असुन हिमायतनगर शहरात एमआयडीसी सह अन्य उद्योग उभारण्यासाठी मुख्यमंत्री यांनी शब्द दिला असुन ते कामही पुर्ण बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे याबरोबरच शहरातील स्वच्छता कायम मिटविण्यासाठी अंडरग्राऊंड च्या कामांसाठी निधी मंजूर करून पाच वर्षात विकासात्मक कामे करण्यावर भर दिला जाईल असे आश्वासन नवनिर्वाचित आ.बाबुराव कदम कोहळीकर यांनी बोलताना केले आहे.
हदगाव विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून बाबुराव कदम कोहळीकर यांचा विजय झाला प्रथमच त्यांचे आगमन शुक्रवारी हिमायतनगर शहरात झाले नवनिर्वाचित आमदार म्हणून शहरात ऐताच भव्य हार घालून कोहळीकर यांचा सत्कार करण्यात आला पेढे वाटून आनंद साजरा केला.प्रथमता श्री परमेश्वराचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले यावेळी परमेश्वर ट्रस्ट कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.
या प्रसंगी कोहळीकर यांचा अनेकांनी सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.सत्कार प्रसंगी बोलताना आ.कोहळीकर म्हणाले की हदगाव हिमायतनगर तालुक्यातील जनतेच्या आशिर्वादाने आमदार होण्याची संधी मिळाली त्या संधीचे सोने करून हिमायतनगर तालुक्यातील विकासात्मक कामांना प्राधान्य देणार आहे याबरोबरच शहरातील स्वच्छता कायम मिटविण्यासाठी अंडरग्राऊंड काम सुरू करणार आहे , शेतकऱ्यांसाठी विज, पाणी हे प्रश्न सोडणार असुन विकास कामे हाच ध्यास असणार असल्याचे सांगितले आहे.यावेळी
यावेळी परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंतराव देवकते, संचालक लताबाई मुलंगे, संचालक अनिल मादसवार, संचालक विलास वानखेडे, जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, माजी बांधकाम सभापती प्रतापराव देशमुख सरसमकर, जी.प. सदस्य चितांगराव कदम, माजी जी प सदस्य लांडगे , विजय वळसे, दासरी मालादासरी समाजाचे अध्यक्ष मुराहारी यंगलवार, डॉ. प्रसाद डोंगरगावकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस गजानन तुप्तेवार, शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजू पाटील शेलोडेकर ,भाजप विधानसभा अध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी, माजी उपनगराध्यक्ष म.जावेद,भाजपा अध्यक्ष गजानन चायल,विकास पाटील देवसरकर, साईनाथ कोमावार, गजानन हरडपकर, सुनिल चव्हाण, अभिषेक लुटे,वामनराव मिराशे, अन्वर खान, सदाशिव सातव, गजानन चायल, राजेश जाधव, साईनाथ कोमावार, उदय देशपांडे, राम नरवाडे, नाथा पाटील , सत्कार प्रसंगी शहरातील हजारो कार्यकर्ते पदाधिकारी ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
