हिमायतनगर तालुक्यात आदर्श शिक्षक असल्यामुळे शाळेची गुणवत्ता टिकून आहे - आ.जवळगावकर

हिमायतनगर प्रतिनिधी/  शिक्षकांचे वक्तीमत्व जेवढे प्रभावी, परिणामकारक, ज्ञान समृद्ध असेल तेवढे ते विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असते. आजची आव्हाने आणि भविष्यातील समस्या यांना सामारे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे हे शिक्षकांनी आपले ध्येय समजले पाहिजे. स्वतःमधील उणिवा जाणीवपूर्वक दूर करणारा शिक्षकच आपले अध्यापनाचे कार्य अधिक प्रभावी, रंजक आणि सुलभपणे करू शकतो.त्या शिक्षकांची दखल कुठेतरी होत असते आजचा गौरव पुरस्कार प्राप्त  आदर्श शिक्षकांमुळेच तालुक्यातील शाळेची गुणवत्ता टिकून असल्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी तालुका शिक्षक पुरस्कार सोहळ्यात बोलताना केले आहे.
      हिमायतनगर शिक्षण विभाग पंचायत समिती व कै.पंजाबराव पाटील जवळगावकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय गुणगौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन दि.26 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते.या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आ.माधवराव पाटील जवळगावकर होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार पल्लवी टेमकर, गटविकास अधिकारी प्रल्हाद जाधव, शिक्षणाधिकारी केशव मेकाले,सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी शिवानंद शिवाचार्य ,शिक्षण विस्तार अधिकारी अरुण पाटील दत्तात्रय धात्रक,जाणते, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड, तालुकाध्यक्ष गजानन सुर्यवंशी होते.

 या तालुकास्तरीय गुणगौरव पुरस्कार सोहळ्यात तालुक्यातील 52 शिक्षकांना गौरव पुरस्कार ट्राफी प्रशस्तीपत्र देऊन आ.जवळगावकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.या सोहळ्यात पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा गौरव प्रसंगी बोलताना आ.जवळगावकर म्हणाले की हिमायतनगर तालुक्यात शिक्षकांची‌ कमतरता कमी असली तरी आदर्श शिक्षकांमुळेच तालुक्यातील गुणवत्ता टिकून आहे कारण येथील प्रत्येक शिक्षक बांधव विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी अथक परिश्रम घेत असतो म्हणून आज त्यांचा गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.आपल्या विषयाच्या अनुषंगाने नवनीवन ज्ञान मिळवून, विभिन्न शैक्षणिक साहित्याचा अवलंब करून आपले ज्ञान अद्ययावत ठेवले आणि आपली तासिका प्रसन्न चित्ताने शिकविण्यासाठी खर्च करील त्यांचे विद्यार्थी नक्कीच ऐकतात. या उमलत्या कळ्यांमधील आंतरिक शक्तींचा स्फुल्लिंग शिक्षकांनी चेतविला पाहिजे तरच विद्यार्थ्यांचं भवितव्य घडेल असे जवळगावकर म्हणाले या कार्यक्रमासाठी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले आहे.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विजय धोबे यांनी केले तर आभार सचिन कळशे यांनी मानले आहे.या सोहळ्यास तालुक्यातील शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.





   


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.