हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनता हिच ताकद - आ.जवळगावकर जिल्हा कांग्रेस कमिटीकडे उमेदवारी अर्ज दाखल


हिमायतनगर प्रतिनिधी/ (सोपान बोंपीलवार)
हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात आजपर्यंत कांग्रेस पक्षाकडून तिन निवडणुका लढविल्या आहेत.पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला त्यामुळे दोन वेळा जनतेनी विश्वासाने निवडून दिले होते त्यामुळे कांग्रेस पक्ष्यांशी एकनिष्ठ राहून मतदारसंघातील विकास कामे केल्यामुळे जनतेच्या बळावर  पक्षाच्या उमेदवारीवरून निवडणूक लढविणार असून मतदारसंघातील मायबाप जनता हिच माझी ताकद असल्याचे आ.जवळगावकर बोलताना म्हणाले.
   हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातुन विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड जिल्हा कांग्रेस कमिटीकडे दि.8 आगस्ट रोजी गुरूवारी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी आपल्या हजारो समर्थकांसह उमेदवारी मागणी अर्ज कांग्रेस जिल्हाध्यक्ष बि.आर.कदम यांच्याकडे दाखल केला आहे.नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात आ.जवळगावकर समर्थकांची गर्दी पाहता जिल्हाध्यक्ष बि.आर.कदम म्हणाले की आ.माधवराव पाटील जवळगावकर हे कांग्रेस पक्षाचे निष्ठावंत आमदार आहेत.हदगाव हिमायतनगर मतदारसंघात ते सामान्य जनतेच्या कामांना प्राधान्य देतात ते यशस्वी आमदार असुन आजच्या गर्दीतून त्यांचा विजय निश्चित असेही सांगत कौतुक केले.
तर आ.जवळगावकर बोलताना म्हणाले की कांग्रेस पक्षाकडून सतत चार वेळा पक्षाने उमेदवारी दिली असुन हि माझी पाचव्या वेळेची मागणी आहे. मातोश्रींना जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळाले होते वडिलापासुन कांग्रेस पक्षासोबत आहे सेवक पर्यंत पक्षाची साथ सोडणार नाही हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील सामान्य जनता माझ्या पाठीशी असुन प्रत्येक कार्यकर्ता हिच माझी ताकद असल्याचे आ.जवळगावकर बोलताना म्हणाले.यावेळी माजी महापौर अब्दुल सत्तार,जे.पी.पाटील , बालाजी चव्हाण, गंगाधर सोनकांबळे,सुभाष पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष राठोड, जिल्हा उपाध्यक्ष डॉ प्रकाश वानखेडे,हिमायतनगर तालुकाध्यक्ष गजानन सुर्यवंशी, हदगाव तालुकाध्यक्ष किशोर पाटील, पंजाब पाटील, माजी नगराध्यक्ष अ.आखिल,अमित आडसुळ, त्र्यंबक पाटील,सभापती जनार्दन ताडेवाड, संचालक शेख रफीकभाई, अनिल पवार, सिताराम पाटील, अहमद पटेल,परमेश्वर गोपतवाड,संजय माने, कैलास माने,संदीप शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, जोगेंद्र नरवाडे, नितेश जैस्वाल, संजय पाटील, बाळू पाटील सुर्यवंशी, बाळा पाटील,योगेश चिलकावार,अ.बाकी, विजय सोनुले, शिवाजी माने, दीपक कात्रे, पापा पार्डीकर,बाबुराव होनमने,यांच्यासह हदगाव हिमायतनगर तालुक्यातील कांग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.