हिमायतनगर प्रतिनिधी/ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सुरूवात झाल्यापासून हिमायतनगर शहरासह ग्रामीण भागातील एकुण 19168 आँनलाईन फार्म आले होते त्यापैकी 9600 फार्म मंगळवार पर्यंत झाले उर्वरित अप्रोल देण्याची प्रक्रिया सुरू होती.1034 फार्म पेंडींग राहिले होते दैनिक पुण्यनगरी मंगळवारी वृत्त प्रकाशित केले होते वृत्ताची दखल घेत प्रशासन अॅक्शन मोडवर आले आणि बुधवारी दिवसभरात 1034 फार्मला मंजुरी दिली आहे.प्रशासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिवसभर उल्लेखनीय कामगिरी केली असुन हिमायतनगर तालुक्यातील लाडकी बहिण योजनेचे शंभर टक्के काम पूर्ण झाले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला हिमायतनगर शहरासह ग्रामीण भागात प्रतिसाद मिळत आहे.ग्रामीण भागातील अनेक लाभार्थ्यांनी मोबाईलवर नारीशक्ती अॅपवरून लाडकी बहिण योजनेसाठी फार्म आँनलाईन करण्यात येत आहेत.अगंणवाडी ताई, सेविका,अशास्ंवयासेविका यांनी गावपातळीवर काम हाती घेतले आहे.तहसिलदार, गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी वेळोवेळी या योजनेचा आढावा घेऊन कामाला गती देण्याचे आवाहन केले होते.त्यानुसार शहरांसह ग्रामीण भागातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी एकुण 19168 लाभार्थ्यांनी आँनलाईन अर्ज सोमवार पर्यंत आले होते.त्यापैकी 9600 लाभार्थ्यांना आपरोल देण्यात आले होते तर 1034 अर्ज पेंडसे स्थितीत अडकले होते.त्यामुळे अनेक लाभार्थ्यी अर्जाला अप्रोल कधी मिळणार या प्रतिक्षेत होते.बुधवारी दैनिक पुण्यनगरी वृत्तपत्रांमध्ये 9600 लाभार्थी मंजूर इतर पे़डींग या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करण्यात आली होती.वृत्ताची दखल तहसील,प़चायत समिती प्रशासनाने घेऊन दि.7 आगस्ट रोजी दिवसभर पंचायत समिती सभागृहात टेबल लावण्यात आले होते.या कामांसाठी तहसीलदार श्रीमती पल्लवी टेमकर, नायब तहसीलदार सुर्यकांत ताडेवाड,गटविकास अधिकारी पि.एम.जाधव ,एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी के.एम.थेटे , विस्तार अधिकारी चेतन अहिरे,मंडळा धिकारी जि.के.आनरवाड, तलाठी आर.डी.गुट्टे ,पं.स.चे स्वप्निल भद्रे, संदीप वानखेडे, गायकवाड, पर्यवेशिका लोकरे,शिला पांडे, संरक्षण अधिकारी संदीप कदमि,अंगणवाडी सेविका - गुनश्री वाघमारे, रिना जाधव, साक्षी पवार, विमल अहिरवाड, श्रीमती दळवी, कविता कदम यांच्यासह तहसील, पंचायत समिती चे कर्मचारी अधिकारी यांनी दिवसभर माझी लाडकी बहिण योजनेसाठी काम केले असुन दिवसभरात शंभर टक्के काम पूर्ण केले आहे.या योजनेचे काम सुरू असून लाभार्थ्यांनी अचुक आँनलाईन अर्ज करावेत असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
