कारला जिल्हा परिषद शाळेला वर्ग आठ‌ शिक्षक तिन विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान- तात्काळ तिन शिक्षक देण्याची शिक्षणाधिकाऱ्यांकडे मागणी

   हिमायतनगर प्रतिनिधी/ कारला जिल्हा परिषद शाळेला आजपर्यंत सात वर्ग सुरू होते यावर्षी शिक्षण विभागाकडून एक वर्ग वाढविला असुन आता शाळेत आठ वर्ग सुरू झाले आहेत परंतु आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी शिक्षकच उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहाण्याची वेळ आली आहे.नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांच्याकडे रिक्त जागेवर तिन शिक्षकांची मागणी ग्रामपंचायत सदस्य सोपान बोंपीलवार यांनी केली येत्या पंधरा दिवसांत हिमायतनगर तालुक्यात पोर्टल च्या माध्यमातून येणारे दोन शिक्षक देण्याचे आश्वासन दिले आहे.

         हिमायतनगर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेची शिक्षण व्यवस्था ढासळली असुन शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे अनेक गावांतील शाळेवर शिक्षकच नसल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.
दि.4 जुलै रोजी पंचायत समिती कार्यालयात नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्या उपस्थितीत तक्रार दिन आयोजित करण्यात आला होता.या तक्रार दिनात सर्वात जास्त शिक्षक नसल्याच्या तक्रारी गावकऱ्यांनी केल्या आहेत.
या बैठकी दरम्यान कारला येथील जिल्हा परिषद शाळेला शिक्षक देण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य सोपान बोंपीलवार यांनी केली लावून धरली गेल्या दोन वर्षांपासून शाळेला तिन शिक्षक आहेत.एक मुख्याध्यापक म्हणून काम पाहतात तर दोन महिला शिक्षक सात वर्ग सांभाळतात दोन ते तिन शिक्षकांवर सात वर्ग आणि नव्याने यावर्षी एक वर्ग वाढला असुन आठ वर्ग झाले आहेत.
त्यामुळे कारला जिल्हा परिषद शाळेला तातडीने तिन नव्या शिक्षकांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली.यावेळी नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी डॉ सविता बिरगे यांनी दखल घेत अवघ्या दहा दिवसांपर्यंत हिमायतनगर तालुक्यात पोर्टल च्या माध्यमातून आलेले दोन शिक्षक 
 कायमस्वरूपी देण्याचे आश्वासन दिले आहे.कारला जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता तातडीने शिक्षक नाही मिळाल्यास 20 जुलै रोजी नांदेड जिल्हा परिषदेसमोर उपोषण करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य सोपान बोंपीलवार, शालेय समिती अध्यक्ष भगवान यमजलवाड, उपाध्यक्ष तुकाराम कदम यांनी शिक्षणाधिकारी यांना दिला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.