गुडी पाडव्याच्या निमित्ताने कारला येथील हनुमान मंदीराचा अखंड हरिनाम व रामकथा ज्ञानयज्ञ सोहळ्यास आजपासून सुरुवात

हिमायतनगर प्रतिनिधी/ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कारला येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिराचा अखंड हरिनाम सप्ताह व राम कथा ज्ञानयज्ञ सोहळा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास सुरुवात झाली असून सात दिवस चालणाऱ्या भक्तिमय सोहळ्याचा आनंद भाविकांनी घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील धार्मिकतेचे गाव म्हणून कारला गावची ओळख आहे.वारकरी सांप्रदायिक मंडळींचे गाव आहे.हनुमान मंदिराचा अखंड हरिनाम सप्ताह व राम कथा ज्ञानयज्ञ सोहळा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा दि.9 एप्रिल ते 16 एप्रील प्रर्यंत चालणार आहे.सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम दररोज सकाळी 5ते 6 काकडा भजन, सकाळी 7ते10 ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 2ते5 संगीतमय राम कथा सायंकाळी 5ते 7 हरिपाठ, रात्री 8 ते 10 हरिकीर्तन होणार आहे.संगीत रामकथा व्यासपीठ ह.भ.प.कृष्णकृपामुर्ती लक्ष्मण महाराज बोरगडीकर, ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ ह.भ.प.भगवान महाराज गुंफलवाड,मृदंगाचार्य ह.भ.प.राम महाराज मंगरूळ,बंज्नो वादक ह.भ.प.राहुल जोगदंड,ह.भ.प.प्रथमेश पुसदकर, गायणाचार्य ह.भ.प.साहेबराव महाराज बोरगडीकर,ह.भ.प.लक्ष्मण महाराज मंदेवाड, मृदंगाचार्य ह.भ.प.प्रथमेश कार्लेकर, तबला वादक ह.भ.प.अशोक महाराज बोंपीलवार, गायणाचार्य शिवाजी भंडारे,ह.भ.प.कोंडबा ताडकुले, हार्मोनियम दशरथ नरोटे,विणेकरी माधव महाराज मिराशे,ह.भ.प.दत्तराव चिंतलवाड, हरिकीर्तनकार ह.भ.प.संजय महाराज करे,ह.भ.प.लक्ष्मण महाराज मंदेवाड,ह.भ.प.शंकर पाटील महाराज,ह.भ.प.बाबुराव महाराज,ह.भ.प.कृष्णा महाराज बोंपीलवार,ह.भ.प.नामदेव महाराज,ह.भ.प.बालयोगी शामसुंदर महाराज, काल्याचे कीर्तन ह.भ.प.लक्ष्मण महाराज यांचे होणार आहे.काल्याचे किर्तन झाल्यानंतर महाप्रसाद होणार आहे.या भक्तिमय सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अखंड हरिनाम सप्ताह कमिटी व ग्रामस्थांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.