महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारासाठी माजी खा.सुभाष वानखेडे, हदगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी कंबर कसली आहे.आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांना घेऊन सकाळी सहा वाजल्यापासून गावोगावी भेटीगाठी सुरू केल्या आहेत.
शनिवारी हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावात आ.जवळगावकर यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या आणि महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांना मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले आहे. प्रचारासाठी निघालेल्या आ.माधवराव पाटील जवळगावकर यांचे गावोगावी मतदारांनी स्वागत केले आहे.दिवसभर जवळगावकर यांच्या मागे कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा सोबत होता.
मतदारसंघाच्या विकासासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे.
तर माजी खा.सुभाष वानखेडे यांनी शनिवारी हदगाव तालुक्यातील गावोगावी मतदारांच्या भेटी घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे.
