हिमायतनगर प्रतिनिधी/ शेलोडा येथे दर वर्षी प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह तथा निळोबा गाथा पारायण सोहळा भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे पंचक्रोशीतील भाविकांनी या भक्तीमय सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील मौजे शेलोडा हनुमान मंदिर येथे वै.ह.भ.प.कामाजी महाराज गांजेगावकर यांच्या प्रेरणेने
अखंड हरिनाम सप्ताह ,निळोबा गाथा पारायण व भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे सदरील सप्ताहास दि. 12 जानेवारी पासून सुरुवात होणार असून 19 जानेवारी रोजी समाप्ती होणार आहे.
या सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम सकाळी काकाडा भजन, तदनंतर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी भागवत कथा, सायंकाळी हरिपाठ व रात्री हरिकीर्तन होणार आहे. किर्तनकार ह. भ.प.ॠषीकेश महाराज शेंबाळपिपंरी, ह. भ.प. पंजाब महाराज चालगणीकर, ह. भ.प.आनंदराव महाराज हातलेकर, ह. भ.प.अशोक महाराज तळणीकर,ह. भ.प.काशिनाथ महाराज माने,ह. भ.प.नामदेव महाराज सोनपेठकर, ह. भ.प.इंद्रजित महाराज रसाळ,ह. भ.प.रामदास महाराज ठाकरवाडीकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.
काकाडा व हरिपाठ गायनाचार्य पांडुरंग महाराज थेरडीकर, सुदर्शन महाराज, उत्तम महाराज बोरगडीकर, केशव महाराज उंचेगावकर, तुकाराम महाराज, दत्ता महाराज,मृदंगाचार्य हरिपाठ काकडा तुकाराम महाराज, किर्तन मृदंगाचार्य विजय महाराज कनकेकर, भागवत संगीत संच केशव महाराज, तबला वादक ओमकार महाराज शिंदे, चौपदार विश्वनाथ गारोळे, किर्तन विनेकरी ह. भ.प.पुरभा महाराज एकंबेकर, काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद होणार असून त्यानंतर अखंड हरिनाम सप्ताह ची सांगता होणार आहे. या सप्ताह भागवत कथेचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन हनुमान मंदिर कमिटी व शेलोडा ग्रामस्थांनी केले आहे.
