हिमायतनगर प्रतिनिधी/ कै.दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठान व हिंदवी बाणा परिवार* तर्फे ह्यावर्षीचा *कै.शंकरराव चव्हाण पत्रकारिता पुरस्कार परमेश्वरजी गोपतवाड* यांना जाहिर झाला याबद्दल त्यांचे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी अभिनंदन कौतुक केले आहे.
हिमायतनगर तालुक्यात निर्भीड पत्रकारिता करणारे जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना कै. शंकरराव चव्हाण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याबद्दल परमेश्वर गोपतवाड यांचा मुख्याधिकारी सुर्यकांत ताडेवाड यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत. गोपतवाड यांनी समाजातील गरजवंतासाठी पत्रकारिता केली असून त्यांच्या लेखनितून गोरगरिबांना न्याय मिळतो त्यांचा आदर्श आजच्या पत्रकारांनी घ्यावा असे मुख्याधिकारी म्हणाले
यावेळी नंदु राऊत, संदीप भुसाळे,अनंता बोलसटवार, आशिष राऊत,शासकिय आश्रम शाळा दुधड चे सहशिक्षक आडबलवाड, गणेशराव भुसाळे, दिगंबर अनगुलवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
