मंगरूळ गावातील विकास कामासाठी निधी कमी पडणार नाही-आ जवळगावकर -- शंभर युवकांचा कांग्रेस पक्षात प्रवेश

हिमायतनगर प्रतिनिधी/ मंगरूळ गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पुलासह गावातील रस्ते विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देणार असून या गावच्या विकासाला निधी कमी पडणार नाही असे आश्वासन आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले आहे. 
       मंगरूळ गावकऱ्यांच्या वतीने शुक्रवारी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या सत्कार सोहळ्यासह आयोजन करण्यात आले होते. मंगरूळ ग्रामस्थांनी आ जवळगावकर यांचे ढोल ताश्याच्या गजरात जंगी स्वागत केले. या सत्कार सोहळ्यात बोलताना आ. जवळगावकर म्हणाले की मंगरूळ गावकऱ्यांच्या गावातील विकास कामासाठीच्या मागण्या लवकरच पुर्ण करू गावातील पाण्याचा प्रश्न, रस्ते, विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभागृहासाठी दहा लाखाचा निधी देण्याची घोषणा केली आहे. याचबरोबर गावातील जुन्या पाईपलाईन ची दुरूस्ती करून पाणी पुरवठा सुरळीत झाला पाहिजे यासह अनेक कामे करून देण्यात येणार असल्याचे आ. जवळगावकर म्हणाले. यावेळी कांग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गजानन सुर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड, सभापती जनार्दन ताडेवाड, संचालक शेख रफिकभाई,माजी नगराध्यक्ष अ.आखील ,परमेश्वर गोपतवाड, गणेश शिंदे, संजय माने, बाळा पाटील, नितेश जैस्वाल, अ. बाकी, अशोक अनगुलवार, योगेश चिलकावार, सरपंच बालाजी पावडे,
 उपसरपंच संतोष अंबेकर, श्रीकांत जललवाड, लताबाई बोरकर, रमेश रुद्रबोईनवाड, चंद्रकांत पेंटेवाड, जिवन जैस्वाल, शेषेकलाबाई सोमनवाड, यांच्यासह 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.