हिमायतनगर प्रतिनिधी/ शहरातील रुख्मानीनगर भागात प्रसूतीच्या वेदनांनी तडफडणाऱ्या एका गोमातेला येथील पशुधन विकास अधिकारी उमेश सोनटक्के यांच्या कार्य तत्परतेमुळे जीवदान मिळाले असून, गाईचा बछडाही सुखरूप जन्माला आला आहे. त्यामुळे गोवंश प्रेमींनी अधिकाऱ्याच्या तत्परतेबद्दल आभार मानले आहे.
हिमायतनगर शहरातील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे एका गोमातेच्या मृत्यू झाला असल्याचा आरोप झाला होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज दि.२२ रोजी शहरातील रुख्मानीनगर भागात प्रसूतीच्या वेदनांनी एका गोमाता तडफडत असल्याचे लक्षात आल्यानंतर पत्रकार यांनी याबाबतची माहिती पशुधन विकास अधिकारी यांना दिली. यावेळी डॉ.सोनटक्के हे नांदेडला मिटिंगसाठी जात असल्याने भोकरपर्यंत पोचले होते. त्यांनी तत्काळ गाभण गोमातेच्या प्रसूती प्रसंगाची दखल गांभीर्याने घेऊन तत्परता दाखवत आपल्या रुग्णालयातील २ कर्मचाऱ्यास पाठवून असहाय वेदनांनी तडफडणाऱ्या गोमातेला उपचार करून सुखरूप प्रसूती करण्याच्या सूचना दिल्या.
त्यामुळे तात्काळ शिंदे आणि कोठेकर या दोन पशुधन कर्मचाऱ्यांनी रुख्मानीनगर भागात उपस्थित होऊन प्रसव वेदनेने बाळाचे तोंड अडकल्यामुळे तडफडणाऱ्या गोमातेला जीवदान दिल आहे. एव्हढंच नाहीतर जन्माला आलेला गाईचा बछडा देखील सुखरूप आहे. आजच्या या प्रसव प्रसंगी वेळेवर पशु कर्मचारी आले नसते तर बछडा गाईच्या पोटातच गुदमरून मृत होऊन गोमातेच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला असता. अशी माहिती सुखरूप प्रसव करणाऱ्या पशु कर्मचाऱ्यांनी बोलताना दिली.
याबरोबरच हिमायतनगर शहरातील कालिंका देवी मंदिर परिसरात एक मोकाट गया पाय खुरत असल्याची माहिती आतिष मादसवार, प्रदीप जिट्टेवाड यांनी बजरंग दल तालुकाध्यक्ष सोपान कोळगिर यांनी सांगितली. त्यांनी लागलीच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सोनटक्के याना माहिती देऊन गोमातेच्या उपचारासाठी तात्काळ येण्याचे सांगितले होते. पशुधन अधिकाऱ्यांनी येथे देखील तत्परतेने सेवा देऊन उपचार करत गाईचे प्राण वाचविले आहे. एकूणच त्यांच्या या तत्परतेच्या कार्याचे पशुप्रेमी नगरीकाकडून कौतुक केले जात आहे. या प्रसंगी पशुधन विकास अधिकारी डॉ.उमेश सोनटक्के म्हणाले कि, आम्ही सेवा देण्यास तत्पर आहोत. या ठिकाणी कर्मचारी व डॉक्टरांची संख्या कमी आहे. वरिष्ठानी येथील रिक्त जागा भरल्या तर आणखी लवकरात लवकर पशूंना सेवा देता येईल. कालच्या घटनेबाबत एकाच वेळी तीन ते चार ठिकाणची पशूंच्या गंभीर आजाराची माहिती मिळाली. त्यामुळे पहिल्यांदा ज्यांनी सपंर्क केला तिथे पोचून उपचार करून यायला आम्हाला उशीर झाला. तरीही प्राथमिकता म्हणूून डांगे यां शेतकऱ्यांना मी औषध द्यायला सांगितले होते, त्यामुळे गाईचा उपचार करण्यात हागर्जीपणा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे त्यांनी सांगितले.
