योजनेंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. वारंवार मागणी करूनही त्या पूर्ण होत नसल्याने कर्मचारी आक्रमक झाले असून मागण्याचे निवेदन आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या कडे दिले आहे.२८ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
हिमायतनगर पंचायत समिती कार्यालयाचे घरकुल विभागाचे कंत्राटी कर्मचारी स्वप्निल भद्रे, किरण चव्हाण यांनी शनिवारी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांची भेट घेऊन ग्रामीण गृहनिर्माण योजने अंतर्गत कार्यरत राज्य विभाग जिल्हा विभाग व तालुका विभाग जिल्हा प्रोग्रामर व तालुका संगणक परिचालक यांच्या मूळ वेतनात वाढ व मागण्या पूर्ण करण्याबाबत. निवेदन देण्यात आले तसेच दि.२८/११/२०२३ पासून ते बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन दिले आहे. शासनाने मानधन वाढीसह इतर मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास २८ नोव्हेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा पवित्रा उचलून घरकुल योजना-ग्रामीणचे कामकाज बंद करण्याचा इशारामहाराष्ट्र राज्य घरकूल संगणक परिचालक संघटनेने निवेदनातून दिला आहे.
सर्व कर्मचाऱ्यांना ५८ वर्षापर्यंत नोकरीची हमी मिळावी, ग्रामविकास विभागांतर्गत येणाऱ्या उमेद, मनरेगा, स्वच्छ भारत मिशन व इतर सर्व विभागांप्रमाणे एचआर पॉलिसी लागू करावी, मूळ मानधानात ३०। टक्के वाढ करावी, मासिक मूळ मानधनातून पीएफ, ग्रॅच्युटी, ईएसआयसी, कपात न करता ती नियमानुसार संबंधित संस्थेने अदा करावी, शासकीय भरतीमध्ये आरक्षित राखीव जागा उपलब्ध करून द्याव्यात, महिन्याच्या ५ तारखेआधी मानधन अदा करावे, अशा विविध मागण्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून केल्या जात आहेत. या मागण्या तात्काळ पुर्ण करण्याची मागणी पंचायत समिती बांधकाम विभागाचे आपरेटर स्वप्निल भद्रे यांनी केली आहे.
