हिमायतनगर प्रतिनिधी/ तालुक्यातील टेंभी येथील तक्षशिला बौद्ध विहारात सोमवारी बुध्दमुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
हिमायतनगर तालुक्यातील आदर्श गाव टेंभी येथील तक्षशिला बौद्ध विहारात बुध्दमुर्तीची प्रतिष्ठापना सोमवारी करण्यात येणार आहे. या प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी नांदेड येथील भंदत संघपाल थेरो, अमरावती येथील भंदत जिवक, परभणी येथून भंदत धर्मकिर्ती यांच्या प्रमुख उपस्थितीत बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना होणार आहे. या बुध्दमुर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी तालुक्यातील बौद्ध उपासक उपासिका बौद्ध बांधवांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन तक्षशिला बौद्ध विहार कमिटी व गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
