हिमायतनगर प्रतिनिधी/ कारला येथील सेवा सहकारी सोसायटीच्या संचालकांसह अनेकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असुन या भाजपा पक्ष प्रवेशामुळे शिवसेनेला सुरुंग लागला आहे.
हिमायतनगर तालुक्यात भाजपाची अनेकांनी वाट धरली आहे. जिल्हा सरचिटणीस गजानन तुप्तेवार, तालुकाध्यक्ष गजानन चायल यांच्या नेतृत्वाखाली अनेकांचा पक्ष प्रवेश सुरू आहे.कारला येथील लक्ष्मण ढाणके यांची भाजपा उपाध्यक्षपदी निवड होताच त्यांच्या नेतृत्वाखाली कारला शिवसेनेच्या संचालकासह अनेक तरुणांनी भाजपात प्रवेश केला आहे. लक्ष्मण ढाणके यांनी शिवसेनेचे काम केले होते. त्यांनी भाजपात प्रवेश करताच तालुका उपाध्यक्ष म्हणून वर्णी लागली आहे. कारला येथील शिवसेनेला सुरुंग लावत शिवसेना पक्षातील कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश करून घेतला आहे. लक्ष्मण ढाणके यांच्या कार्याचे भाजपा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी कौतुक केले आहे.
