आरक्षणाच्या मागणीसाठी सिरपली सिलोड्डा गावातील मराठा समाजाचा मतदानावर बहिष्कार पुढाऱ्यांना गावबंदी ग्रामसभेचा एकमुखी ठराव / तहसीलदारांना निवेदन

हिमायतनगर प्रतिनिधी/ मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अन्यथा सिरपली-सिलोडा गावातील मराठा समाजाच्या वतीने येणाऱ्या निवडणुकीत पुढाऱ्यांना गावबंदी आणि मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा ठराव ग्रामसभेत घेऊन मराठा समाजाच्या वतीने निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे. 
     हिमायतनगर सिरपली-सिलोडा येथे दि. 11 सप्टेंबर रोजी ग्रामसभा घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या पंधरा दिवसापासून मनोज जरांगे आणि हदगाव येथील दत्ता पाटील हाडसणीकर यांना पाठिंबा दर्शवला आहे. आणि मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी आणि मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला असुन या ठरावाला ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक,सदस्यांनी मान्यता दिली आहे.सदरील ठरावाची प्रत जोडून तहसीलदार यांना मराठा आरक्षणाच्या मागण्याचे निवेदन मंगळवारी देण्यात आले आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.