हिमायतनगर तालुक्यात जनावरांना लंम्पी आजाराची लागण- शेतकऱ्यांनी बाधित जनावरांची माहिती कळवावी- पशुधन विकास अधिकारी सोनटक्के यांचे अवाहन

हिमायतनगर प्रतिनिधी/ तालुक्यातील जनावरांना लंम्पी आजाराची लागण मोठ्या प्रमाणात सुरू झाली असुन या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यासह त्यांच्या टीमकडून बाधित पशुधनावर उपचार सुरू आहेत ऐन
  पोळा सणावर पशुधनावर लंम्पी आजाराचे संकटं आल्याचे चित्र लंम्पी आजाराच्या आकडेवारीवरून दिसत आहे. 

       हिमायतनगर तालुक्यात पशुधनावर लंम्पी आजाराचे संकटं आले असुन गेल्या काही दिवसात तालुक्यातील 61 गोवंश जनावरे लंम्पी रोगाने बांधीत झाली असून यापैकी 48 जनावरे उपचारादरम्यान निरोगी झाले आहेत. तालुक्यातील जवळपास 14 हजार जनावरांवर लसीकरण करण्यात आले आहे. लंम्पी आजारा बाबतीत शेतकऱ्यांनी जनावरांची काळजी घ्यावी अवघ्या काही दिवसावर पोळा सण असुन या सच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी पोळा सणा दरम्यान बाधीत बैल, किंवा गोवंश जनावरे एकत्र आणू नये दुर अंतर ठेवून सण साजरा करावा अशी माहिती पशुधन विकास अधिकारी उमेश सोनटक्के यांनी सांगितली आहे. 
    हिमायतनगर तालुक्यात शेतकऱ्यांपर्यंत जाऊन पशुवैद्यकीय अधिकारी उमेश सोनटक्के आपल्या टीमसह बाधित जनावरांवर गावोगावी जाऊन उपचार करीत आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांनी बांधीत जनावराची माहिती कळवावी जेणेकरून बाधित जनावरावर तात्काळ उपचार करण्यास मदत होईल प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची काळजी घ्यावी लंम्पी आजाराने बाधित आढळून आल्यास माहिती कळवावी अशी माहिती पशुधन विकास अधिकारी उमेश सोनटक्के यांनी पुण्य नगरीशी बोलतांना दिली आहे.पशुवैधकीय दवाखाना श्रेणी 2 कामारी महोमद अजगर,बालाजी मिराशे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 2 सरसम, आनंद लोखंडे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 2 मंगरूळ, कु. चंचल जाधव या टिमसह पशुवैद्यकीय अधिकारी उपचार करीत आहेत. शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे

  



 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.