हिमायतनगर प्रतिनिधी/संत एकनाथ महाराजांच्या कार्याचे वेगळेपण सहज दृगोचर होते. आपण आपले कार्य आपल्या वागण्यातून करावे, आचरणातून दाखवावे, त्याचा परिणाम समाजावर होईल आणि तो आचार-विचार समाजाला पटला तर तो विचार समाज पटकन उचलून धरेल हीही खात्री त्यांना होती. संत एकनाथांची ती खात्री सार्थ होते असे एकनाथ बिज सोहळ्यात आयोजित किर्तन सेवेत ह. भ. प. योगेश महाराज सोळंकी यांनी केले आहे.
धानोरा संत एकनाथ महाराज यांच्या बिज उत्सव सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो या सोहळ्यानिमित्त संत एकनाथ महाराजांची पालखी काढण्यात आली होती. मंदिर परिसरात एक दिवस भव्य यात्रा भरविण्यात येते यावर्षी देखील या बिज उतस्व सोहळ्यास विदर्भ मराठवाड्यासह आंध्रप्रदेशातील भाविकांनी गर्दी केली होती. यानिमित्ताने ह. भ. प. योगेश सोळंकी महाराज आळंदीकर यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी किर्तन सोहळ्यात ह. भ. प. आळंदीकर महाराज म्हणाले की समाजात निरनिराळ्या प्रकृती व प्रवृत्तीची माणसे असतात. समाजात राहायचे म्हणजे समाजाच्या नीती-नियमांचे पालन करावे लागते मनुष्य जन्माला येतो तेव्हा तो एका विशिष्ट सांस्कृतिक वातावरणात जन्माला येतो. बालपणापासूनच त्याच्या मनावर त्या संस्कृतीचे संस्कार होतात. हे संस्कार माणसाचे व्यक्तिमत्त्व घडवित असतात. त्याच्यासमोर आदर्श कुठले आहेत, तो कुठल्या समाजात जन्म घेतो, यावर त्याच्या जीवनाची दिशा ठरते. आई-वडील, बहीण-भाऊ, जवळचे नातेवाईक, त्याच्या सानिध्यात येणाऱ्या इतर व्यक्ती यांचा नकळत माणसाच्या मनावर परिणाम घडून येत असतो. संत एकनाथ महाराजांना देखील ह्य परंपरा जपून आपले कार्य समाजामध्ये ठेवले होते म्हणून आजच्या पिढीला संत एकनाथ महाराजांच्या विचारांची त्यांच्या संस्काराची गरज असल्याचे ह. भ. प. योगेश महाराज सोळंकी यांनी केले आहे. किर्तन सेवेला बोरगडी,खैरगाव,धानोरा येथील मृदंग, टाळ,गायणाची साथ केली.या बिज उत्सव सोहळ्याची सांगता दहीहंडी फोडून महाप्रसादाच्या पगंतीने करण्यात आली.धानोरा ग्रामस्थांनी या बिज उत्सव सोहळ्यासाठी अथक परिश्रम घेतले आहे.
