प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर घोडगे लिखित'सुगीचे दिवस' पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

हिमायतनगर प्रतिनिधी/ नांदेड प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर घोडगे यांच्या 'सुगीचे 'दिवस' (स्वकथन) या पुस्तकाचे प्रकाशन रविवार दिनांक - १२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३५ वाजता नागोराव नरवाडे मंगल कार्यालय पुर्णा रोड, नांदेड येथे होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक तथा समिक्षक प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे (औरंगाबाद) हे राहणार आहेत तर   'सुगीचे दिवस' पुस्तकाचे प्रकाशन प्रा. डॉ. प्रदिप आगलावे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते होणार आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, आ. माधवराव पाटील जवळगावकर, आ. बालाजी कल्याणकर, सुरेशदादा गायकवाड उपस्थित राहणार आहेत. या प्रकाशन सोहळ्याचे स्वागताध्यक्ष म्हणून प्रसेनजित कारलेकर-घोडगे (कक्ष अधिकारी मंत्रालय, मुंबई) व डॉ. श्रीकांत धिवर (केंद्रीय वैद्यकीय अधिकारी, पुणे) हे राहणार आहेत. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत असे आवाहन संयोजक कल्पना घोडगे, स्वाती कारलेकर यांनी केले आहे. 

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.