व्यसनाला सोडचिठ्ठी देणा-यानी संतांचा आदर करुन जपल्यास जीवनाचा ऊध्दार होतोय...आ.जवळगावकर

 हिमायतनगर प्रतिनिधी/ तालुक्यात आजपर्यंत अनेक मेळावे झाले असून   बुलढाणा जिल्ह्यातील शिवपुर येथील संतोष महाराज यांनी समाज सुधारण्यासाठी व्यसन मुक्ती मेळाव्याचे आयोजन करुन जनजागृती करीत आहेत.या मेळाव्यात स्वयंस्फूर्तीने अनेकांनी व्यसनाला तिलांजली दिली हे कौतुकास्पद असुन पुन्हा आपण व्यसनाकडे वळणारच नाही.हा ठाम निर्धार करीत आपला संसार सुखी जगावा हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून वागणा-या संतांचा आदर्श समोर ठेवून वागल्यास निश्चितच  जीवनाचा ऊध्दार झाल्याशिवाय राहणार नसल्याचा आत्मविश्वास आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी व्यक्त केला.             
 हिमायतनगर तालुक्यातील महादापुर येथे २२ जानेवारी रोजी संतोष महाराज यांच्या विशेष उपस्थितीत व्यसन मुक्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पुढे बोलताना आ.जवळगावकर म्हणाले की, दारुचे व्यसन जडत  असल्यामुळे अशा कुटुंबात समाधान राहत नाही. अनेक संसाराचे वाटोळे होत असल्याचे संतांना पाहवत नाही म्हणून संत समाजापुढे आपल्या प्रवचनात,किर्तनात सतत संबोधित करीत आहेत.आपण संतांचा उपदेशाचे पालन करणे आपल्या हितांचे ठरु शकते असेही आ.जवळगावकर म्हणाले.     याप्रसंगी संतोष महाराज यांनी वडील वै.शेषराव महाराज यांचे  कार्य सविस्तर ऊपस्थीताना आपल्या मार्गदर्शनातुन सांगीतले.बाबानी जवळपास दिड कोटी तर माझ्या कडुनही आजपर्यंत एक कोटी नागरिकांना व्यसनापासून दूर करण्यात यश मिळवले आहे.विशेष म्हणजे यासाठी कुठलीही फिस आकारल्या जात नसल्याचे स्पष्ट पणे सांगीतले.कार्यक्रमास युवा सेना जिल्हा प्रमुख कृष्णा पाटील आष्टीकर, परमेश्वर गोपतवाड, विशाल राठोड,सत्यवृत ढोले, सरपंच सुनील शिरडे, शंकरराव वागतकर यांच्या सह   हिंगोली,कळमणुरी सह रुई धानोरा,थारा सह हिमायतनगर भागातील असंख्य महिला, पुरुष ऊपस्थीत होते.कार्यक्रमाचे संचलन एकनाथ बुरकुले यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी आलेवाड, भगवान मेंडके, मोहनराव बुरकूले,आबोरे, बनसोडे,देशमुखे, बोडके, डवरे, भडंगे,ढाले,झळके, मेंडके आदिनी परीश्नम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.