महर्षी मार्कण्डेंय मंदीराच्या विकासासाठी प्रयत्नशिल- आ. जवळगावकर

हिमायतनगर प्रतिनिधी/ शहरातील पद्मशाली समाज बांधवाच्या सहकार्यातून महर्षी मार्कंडेय मंदीर उभे राहिले असुन या मंदीराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी आयोजित मार्कण्डेंय जयंती सोहळ्यात बोलतांना केले आहे. 
हिमायतनगर शहरातील पद्मशाली समाजाच्या वतीने महर्षी मार्कण्डेंय जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते मंगळवारी महर्षी मार्कण्डेय जयंती निमित्त मंदिरात भव्य पुजा करण्यात आली व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. जयंती निमित्ताने आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी महर्षी मार्कण्डेयं दर्शन घेतले व यावेळी कमिटीच्या वतीने आ.जवळगावकर यांचा सत्कार केला. 
यावेळी बोलताना आ. जवळगावकर म्हणाले की महर्षी मार्कण्डेयं आराधना व विद्येच्या जोरावर चिरंजीवी प्राप्त झालेले मार्कंडेय ऋषी यांची महती ही अनन्य साधारण मानल्या जाते म्हणुनच अनेक वेद पुराणांमध्ये मार्कंडेय ऋषीचे नाव अग्रभागी दिसून येते. मार्कंडेय ऋषी प्रमाणे कर्तुत्व घडावे हाच आदर्श प्रत्येकाने ठेवला पाहिजे या मार्कंडेय मंदीराच्या कलशारोहण व परिसरातील सुशोभीकरणासाठी आपण कठिबध्द असुन माता कांलींका देवी मंदीराच्या कामा सारखे वैभव या ठिकाणी देखील उभे करु अशी ग्वाही आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी दिली आहे. यावेळी कांग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष जनार्दन ताडेवाड , शहराध्यक्ष संजय माने, ज्ञानेश्वर शिंदे, गोविंद गोडबलेवार , नागेश दासेवार, डॉ. शिवप्रसाद लखपत्रेवार,गजानन रच्चेवार,  
 विश्वाभंर मादसवार, गोपी गोडबलेवार, दत्तात्रय गुंडेवार,रामकृष्ण मादसवार, ज्ञानेश्वर पालीकोंडवार, धर्मपुरी गुंडेवार, दिलीप गुडेटवार, संजय बोड्डावार , विठ्ठल गुंडेवार, नारायण गुंडेवार,योगेश चिलकावार, गणेश रामदिनवार, गजानन मादसवार, रामू चाटलेवार, यांच्यासह जयंती सोहळ्याचे प्रास्ताविक नाथा गंगुलवार यांनी केले या सोहळ्यात पद्मशाली समाजातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.