दत्ता शिराणे यांना स्व. विलासराव देशमुख उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर.

हिमायतनगर. :- ( बातमीदार )कै. दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार दै. प्रजावानीचे हिमायतनगर प्रतिनीधी दत्ता गणपतराव शिराणे यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराची घोषणा नुकतीच कंधार येथून करण्यात आली आहे. 

हिंदवी बाणा लाईव्ह च्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दरवर्षी कै. दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठान च्या वतीने पत्रकारितेत उत्कृष्ट योगदान देणाऱ्या पत्रकारांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. गेल्या दिड दशकापासून तालुक्यातील शोषित, वंचित, पीडित, कामगार, शेतकरी, शेतमजुरांच्या न्याय हक्कांसाठी, त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी पत्रकारितेत आपली लेखणी झिजविणार्या दत्ता शिराणे यांना या वर्षीचा माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुर्वी ही दत्ता शिराणे यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नुकत्याच घोषित झालेल्या पुरस्काराबद्दल जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड,प्रकाश जैन, अनिल मादसवार, गोविंद गोडसेलवार, अशोक अनगुलवार, दिलीप शिंदे, मनोज पाटील, नागेश शिंदे, सर्व पत्रकार ,मान्यवर, मित्र मंडळीनी दत्ता शिराणे यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.