हिमायतनगर प्रतिनिधी/... नायगाव तालुक्यातील खंडगाव जि . प. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहल मराठवाड्यातील सहस्रकुंड धबधबा येथे भेट देऊन सहलीचा आनंद घेतला आहे.सहस्त्रकुंड धबधब्याची विषयी विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मार्गदर्शन केले आहे.
नांदेड जिल्ह्यातील सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी असते परंतु सध्या धबधब्याची खळखळणारी धार कमी झाली आहे. खंडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील भौगोलिक माहिती व्हावी या उद्देशाने सहलीचे आयोजन केले होते. मंगळवारी या शाळेच्या विद्यार्थ्यांची सहल मराठवाड्यात प्रसिद्ध असलेल्या सहस्रकुंड धबधबा येथे जाऊन तेथील सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. व माहूरगड येथील रेणुकामाता देवी दर्शन देखील विद्यार्थ्यांना घडवून आणले आहे. या सहलीतुन विद्यार्थ्यांनी आनंद घेतला आहे. यावेळी खंडगाव जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक ए. सी. पठाण, ए. जी. अंधोरे, एस. एच. पवार, जी जी, भुरे, के. एच. भोसले, एस. व्ही.बारडे, आर. जी. चव्हाण, यांनी सहलीतुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
