हिमायतनगर प्रतिनिधी/प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना,शबरी योजना या योजनेतील लाभार्थ्यांना पहिला हप्ता प्राप्त झालेला होता तर काही लाभार्थ्यांना नव्याने मंजुरी मिळाली आहे त्या एकूण 391 लाभार्थ्यांच्या घरकुलांचे भूमिपूजन करून काम सुरू करण्यात आले आहे.
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना व इतर राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ३१ डिसेंबरपर्यंत १०० टक्के ऑनलाईन मजुरी व ३१ मार्च २०२३ पर्यत मंजूर झालेले सर्व घरकुल पूर्ण करावयाचे आदेश शासनाने दिल्यामुळे घरकूल योजनेत गतिमानता येण्यासाठी तसेच घरकुलांची कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी मंजूर झालेली घरकुले परंतु काम न सुरु झालेल्या लाभार्थाव्यांचे ५ व ६ जानेवारी रोजी भूमिपूजन करण्याचे, त्याबाबत सूक्ष्म नियोजन करण्याचे व लाभार्थ्यांच्या घरकुलाचे भूमिपूजन करण्याचे आदेश पंचायत समितीच्या वतीने देण्यात आले आहेत. त्यानुसार
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत आवास योजनेअंतर्गत हिमायतनगर तालुक्यातील 52 ग्रामपंचायत मध्ये एकुण 391 लाभार्थ्यी होते त्यातील घरांची कामाचे भूमिपूजन करून काम सुरू केली आहेत. ग्रामपंचायत महादापूर, टेंभी, धानोरा ज, सरसम, दुधड- वाळकेवाडी,या गावातील लाभार्थ्यांना गटविकास अधिकारी मयूर आंदेलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पं. स. चे अभियंता विशाल पवार, अभियंता वसंत सोनटक्के , भद्रे,ग्रामसेवक भोगे, यु.जी पठाण , ग्रामविकास अधिकारी कोंडामंगल , यांनी लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले . यावेळी अॅड अतुल वानखेडे, सौ. काशीबाई ठाकूर, गोविंद गोडसेलवार, स्वप्निल अंबलवाड पांडुरंग चेलार, उपसरपंच संजय माझळकर , विलास काटकाडे , सुदाम ढाले रोजगार सेवक दत्ता धनवे , प्रवीण चव्हाण,यांच्यासह सरपंच, उपसरपंच,सदस्य ,ग्रामस्थांची उपस्थिती होती.
