मोरगावच्या सर्वांगीण विकासासाठी कुठेही कमी पडणार नाही..आ.जवळगावकर

     हिमायतनगर प्रतिनिधी/  भोकर हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गा पासून मोरगाव ला जोडणा-या रस्त्यासह पांदण रस्ते एका महिन्यात मार्गी लागल्याचे चित्र आपणास पाहावयास मिळेल.गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कुठेही कमी पडणार नसल्याची ग्वाही आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी दिली. 

तालुक्यातील पारवा बु ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या मोरगाव येथे ४ डिसेंबर रोजी जलजीवन योजनेअंतर्गत घरघर नळयोजनेच्या कामांचे भूमिपूजन आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पुढे बोलताना आ.जवळगावकर म्हणाले की, मोरगाव ते कांडली जोडणारा पांदण रस्त्यांचे मातोश्री मधुन मजबुतीकरणाचे काम निश्चितच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.येथील अनियमित  विद्युत पुरवठा तिनं दिवसांत सुरळीत करण्याच्या सूचना महावितरण कंपनी च्या संबंधीत अधिका-याना केल्या.विधानसभा मतदार संघातील १३२ गावांना थेट ईसापुर धरणातुन   पिण्यासाठी स्वच्छ पाणी पुरवठा मंजुर झाला आहे.३२ गावाचे कामही सुरू झाले आहे.मतदार संघातील वाडी, तांडा,गावा गावात पाणी पुरवठा करण्यासाठी विशेष लक्ष देणार असल्याची ग्वाही आ.जवळगावकर यांनी दिली. याप्रसंगी  संतोष भिबरवाड, ऊपसरपंच राजीव, शेळके यांनी आ.जवळगावकर यांचा शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करुन गावच्या विकासाची मागणी केली आहे.  यावेळी हदगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आनंदराव भंडारे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव चोडे, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष परमेश्वर गोपतवाड, कैलास पाटील माने, कनिष्ठ अभियंता हिरप, सरपंच  बाला पाटील , चेअरमन संजय पाटील सुर्यवंशी, सरपंच विनायक पाटील पवार,   दत्तात्रय पवार,  साईनाथ सुर्यवंशी,  सज्जन जाधव, शिंदे, शेळके, ग्रामसेवक मुतनेपवाड, तलाठी पन्नावार, तानाजी कोरे,मसाजी पाटील, गुणाजी राचेवाड,शेख बाबुमियाॅ , गोपीनाथ बिटेवाड यांच्या सह ग्रामस्थांची उपस्थिती होती.सचलन बालाजी शेळके यांनी केले तर आभार विनायक शिंदे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.