ग्रामसेवकास मारहाण करणाऱ्या दोघांवर हिमायतनगर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल - ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लागणारे बेबाकी प्रमाणपत्र देण्यास झाली होती टाळाटाळ

हिमायतनगर प्रतिनिधी/
बेबाकी प्रमाणपत्र देण्यास विलंब झाल्याच्या कारणावरून दरेगाव येथील दोघांनी ग्रामसेवक केरबा धोंडिबा सूर्यवंशी यांना हिमायतनगर शहरातील कमानीजवळ बोलाउन प्रमाणपत्र देण्यास का चालढकल करत असल्याचे  कारण अमोर करून  मारहाण केली आहे. या घटनेनंतर ग्रामसेवकाने दिलेल्या तक्रारीवरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात संतोष बन्सिलाल राठोड व मोहन प्रेमसिंग राठोड या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे दरेगाव येथील ग्रामसेवकास मारहाण करणे दोघांना महागात पडले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यातील मौजे दरेगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरु आहे. यासाठी तालुक्यातील मौजे दरेगाव येथील एक इच्छूक उमेदवार संतोष बन्सीलाल राठोड हा ग्रामसेवकाकडे आवश्यक कागदपत्रांची मागणी करत होता. मात्र सदरील ग्रामसेवक त्याना ती कागदपत्रे काही देत नव्हता. त्यामुळ इच्छूक उमेदवाराचा पारा चढला आणि त्याने ग्रामसेवक केरबा धोंडीबा सुर्यवंशी यांना हिमायतनगर शहरातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या श्री परमेश्वर मंदिर कमाणीजवळ दरेगाव तांडा येथील संतोष बन्सीलाल राठोड व मोहन प्रेमसिंग राठोड यांनी फोन करुन साहेब कुठे अहा... अम्हाला बेबाकी प्रमाणपत्र पाहिजे.... तुम्ही कमानी जवळ या असे त्यांना सांगितले. ग्रामसेवक सुर्यवंशी हे बेबाकी प्रमाणपत्र घेऊन परमेश्वर कमाणी जवळील चहाच्या हॉटेलजवळ थांबले असता... आरोपी संतोष आणि मोहन आले आणि तुमचा फोनच लागत नाही असे म्हणत हुज्जत घालू लागले होते.

  आर्वाच्छ भाषेत शिविगाळ करुन काॅलर धरली व झटापट करुन नागरिक समक्ष दिवसाढवळ्या  मारहाण केली....आणि त्यांच्या जवळ असलेल्या शासकीय कामाच्या कागद पत्राची नासधुस करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. यावरून ग्रामसेवक संघटना आक्रमक होऊन हिमायतनगर पोलीस ठाण्यात पोचले आणि त्यांनी थेट मारहाण करणाऱ्याच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आनला अशी फिर्याद दिली. यावरून आरोपी संतोष बन्सिलाल राठोड व मोहन प्रेमसिंग राठोड या दोघांवर भादवि कलाम ३५३,३३२,३२३,५०४,५०६,३४, अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती कायदा अधिनियम १९८९ अंतर्गत ३ (१) (r), ३(१) (s) अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरिक्षक बि.डी.भूसणूर करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.