कृषी क्षेत्रात उल्लेखनीय करणाऱ्या सुनिता माने यांचा डॉ शंकरराव चव्हाण कृषिनीष्ट पुरस्काराने सन्मान

हिमायतनगर प्रतिनिधी/ पोटा येथील प्रगतिशील शेतकरी सौ. सुनिताबाई कैलास माने पोटेकर यांनी त्यांच्या शेतात प्रगत कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक नाविन्यपूर्ण शेती केल्याबद्दल त्यांचा माळेगावच्या यात्रेत आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते डॉ शंकरराव चव्हाण कृषिनीष्ट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. 
   हिमायतनगर तालुक्यातील पोटा बु. येथील शेतकरी सौ. सुनिताबाई कैलास माने यांनी आपल्या शेतात प्रगत कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून नाविन्यपूर्ण पध्दतीने शेतीत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन 2022-23 च्या जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून देण्यात येणाऱ्या डॉ शंकरराव चव्हाण कृषिनीष्ट पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. 
 दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या खंडोबाच्या माळेगावच्या यात्रेच्या पहिल्या दिवशी डॉ.शकरराव चव्हाण कृषीनिष्ट पुरस्कार आ.श्यामसुदर शिंदे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, सौ.आशाताई शिंदे, जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तुबगले, ऊपमुख्यकार्यकारी अधिकारी पंचायत श्नीमती कापसेताई, कृषी विकास अधिकारी डॉ चिमन शेट्ये, जिल्हा कृषी अधीक्षक चलवदे, उत्तमराव देशमुख,पी.आर.माने आदिंसह मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला आहे.एक महिला शेतकरी शेतात प्रगत कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक नाविन्यपूर्ण शेती करून सुनिताबाई कैलास माने यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शांताबाई पवार जवळगावकर, आ. माधवराव पाटील जवळगावकर, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष परमेश्वर गोपतवाड, पोटा बु येथील सरपंच प्रतिनिधी दत्तात्रय पवार, ग्रा.प.सदस्य शेख ईर्शादभाई, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब इंगळे, भुजंगराव देशमुख, स्वराज्य माने, राजीव बुटले, सोमनाथ मेडेवाड आदींनी अभिनंदन कौतुक केले आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.