हिमायतनगर प्रतिनिधी/ कृषी उत्पन्न बाजार समिती च्या होणाऱ्या निवडणुकी पुर्वी कांग्रेस पक्षाच्या प्रत्येक गावच्या कार्यकर्त्यांनी तयारीला लागायचे असुन हि होणारी निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची असणारी निवडणूक आहे त्यासाठी प्रत्येकांनी तयारीला लागायचे असल्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी बैठकीत सांगितले आहे.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकी संदर्भात जवळगाव येथे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, संचालक, हमाल मापाडी संघटनेचे अध्यक्ष,सदस्य यांची उपस्थिती होती. या बैठकीत आ. जवळगावकर म्हणाले की येत्या काही दिवसात कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम लागणार आहे. त्यामुळे आजपासून कांग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सरपंच, चेअरमन, यांनी तयारी करायची असुन हि निवडणुक आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपंचायत ची तालीम असुन त्यामुळे हि निवडणुक जिंकण्यासाठी प्रत्येकांनी तण मनाने काम करायचे असल्याचे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी सांगितले आहे. यावेळी अनेकांनी प्रश्न मांडले होते. यावेळी सरपंच संघटनेचे अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड, उपाध्यक्ष बाळा पाटील, गणेश शिंदे, सुभाष राठोड, अतुल वानखेडे, रफिकभाई, प्रल्हाद पाटील,अ. आखील,डॉ प्रकाश वानखेडे, कैलास माने,संदीप पळशीकर, फेरोज खान, संजय माने, गोविंद बंडेवार, समद खान, शिवाजी जाधव, अ.बाकी,जनार्दन ताडेवाड,
जोगेंद्र नरवाडे, प्रविण जाधव,दिलीप पार्डीकर,फेरोज खुरेशी, यांच्यासह चेअरमन, सरपंच, उपसरपंच, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
