निरोगी राहण्यासाठी नागरीकांनी गाव हागणदारीमुक्तीसाठी पुढाकार घ्यावा-पं.स.विस्तार अधिकारी डि.पी.धर्मेकर

हिमायतनगर प्रतिनिधी/ नागरीकांनी आपण निरोगी राहण्यासाठी आपला गाव हागणदारीमुक्त केला पाहिजे प्रत्येकांनी त्यासाठी पुढाकार घेऊन ग्रामपंचायत ला सहकार्य करावे आणि गाव हागणदारीमुक्त करावे असे आवाहन आमचा गाव आमचा विकास आराखडा च्या आयोजित ग्रामसभेत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी डि.पी.धर्मेकर यांनी सांगितले आहे. 
      कारला पी. ग्रामपंचायत च्या आमचा गाव आमचा विकास 2022-23 चा आराखडा तयार करण्यासाठी सरपंच गजानन पाटील कदम यांच्या अध्यक्षतेखाली तर विस्तार अधिकारी डि.पी.धर्मेकर यांच्या उपस्थितीत बुधवारी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. 

 महिला ग्रामसभा ही घेण्यात आली. ग्रामसभेत उपस्थित नागरीकांना ग्रामसेवक नारायण काळे यांनी आमचा गाव आमचा विकास आराखडा विषयावर माहिती दिली. तर या ग्रामसभेस पंचायत समितीचे विस्तार अधिकारी डि. पी. धर्मेकर यांनी नागरीकांना मार्गदर्शन केले. 

ग्रामपंचायत कडून पंधरा वित्त आयोगातून गावचा विकास साधता येतो यामध्ये आमचा गाव आमचा विकास आराखडा तयार करून गावातील स्वच्छता,पाणी शुद्धिकरण, पाणी पुरवठा,हागणदारीमुक्त गाव हि कामे करावी गाव हागणदारीमुक्त झाल्यास गावातील रोगराई नष्ट होईल आणि प्रत्येक नागरीक निरोगी जीवन जगू शकेल यासाठी प्रत्येक नागरीकांनी हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे धर्मेकर यांनी सांगितले आहे. 
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सोपान बोंपीलवार, रामेश्वर यमजलवाड, गजानन मिराशे, रामा मिराशे, दत्ता चिंतलवाड,साहेबराव घोडगे, नागसेन गोखले, ग्रामसभेचा समारोप आभार तंटामुक्ती अध्यक्ष डॉ गफार यांनी केले. 





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.