हिमायतनगर प्रतिनिधी/- घारापुर येथे सेवा संस्था आणि कॉटन कनेक्शन साउथ आशिया व पीएससीपी प्रोग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला शेतकरी मेळाव प्रसंगी किनवटचे उपविभागीय कृषी अधिकारी राजकुमार रणवीर महिला शेतकऱ्यांनी शाश्वत शेती करून आपला विकास साधला पाहिजे असे बोलताना सांगितले आहे.
हिमायतनगर तालुका कृषी विभागाच्या वतीने घारापुर येथील ढगे फार्म हाऊसचे प्रगतिशील शेतकरी गणपतराव ढगे यांच्या शेतामध्ये हा महिला शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास 27 गावच्या महिला शेतकरी उपस्थित होत्या. शेतीविषयक माहिती या मेळाव्यात सांगण्यात आली. या मेळाव्यात उपस्थित महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना उपविभागीय अधिकारी रणवीर म्हणाले की ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी शाश्वत शेती करून डेम्मो प्लाट तयार कसा करावा याबद्दल मार्गदर्शन केले. शाश्वत शेती करून शेतकऱ्यांनी आपला विकास साधला पाहिजे असेही सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय कृषी अधिकारी रणवीर, तालुका कृषी अधिकारी जाधव, देविकांत देशमुख वरिष्ठ शास्त्रज्ञ पोखरणी, समर्थ बोरगावे, गौतम पाटील,
सदानंद ढगे, डॉ. ढगे , भागवत कालुरकर, विकास चव्हाण सेवा संस्थेचे राज्य समन्वयक पंकज देशमुख, बाळू दीदी निरंजन दीदी, डॉ.परभणीकर, हेमराज बालपांडे ,राजेंद्र चामनार ,शेतीतज्ञ बालाजी हुंबे, भाग्यश्री कोहली, निखिल शेवाळे, आरती भंडारे ,श्रुती जाधव यांची उपस्थिती होती.
