हिमायतनगर प्रतिनिधी/ मागील काही महिन्यापूर्वी दिल्ली येथील श्रद्धा वालकर या तरुणीची क्रूरकर्मी आफताब यांत प्रेम संबंध जुळवून नवीन रिलेशनशिप मध्ये ठेवले होते त्यानंतर श्रद्धा वालकर हिने आफताबकडे लग्नाची मागणी केल्यानंतर आफताब ने अत्यंत क्रूरतेने श्रद्धाची हत्या करून तिच्या शरीराचे 35 तुकडे केले होते. आणि या घटनेनंतर संपूर्ण भारत देश ढवळून निघाला असून या हत्याकांडातील आरोपी आफताबला फासावर लटकवण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. यासाठी ठिकठिकाणी निवेदन आंदोलन केले जात असून, त्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर शहरात सोमवार दि 28 रोजी सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्याने भव्य मोर्चा काढून श्रद्धा वालकर हत्येचा निषेध करण्यात आला.शहरातील परमेश्वर मंदिरात सर्व समाज बांधव विद्यार्थी विद्यार्थिनींनी हजारोच्या संख्येने उपस्थित होऊन कु अंजली विठ्ठल ठाकरे या युवतीने सखोल मार्गदर्शन करून मैत्री कशी करावी, कस वागावं, कसं बोलावं यासंदर्भात मार्गदर्शन केले. त्यानंतर शहरातुन भव्य निषेध रॅली काढली, रैली परत परमेश्वर मंदिरात आल्यानंतर या ठिकाणी विविध मान्यवर महिलांनी उपस्थित सर्व मुलींना मार्गदर्शन केले. लव जिहाद या प्रेमाच्या नावाखाली चालविणाऱ्या प्रकाराला कोणीही बळी पडू नका असे आवाहन करण्यात आले. यावेळी श्रद्धा वालकर यां तरुणीच्या हत्येच्या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. तसेच लव्ह जिहाद सारख्या जीवघेण्या प्रकरणावर अंकुश ठेवण्यासाठी शासनाने कठोरातील कठोर कायदा करण्यात यावा, धर्मांतर बंदी कायदा लागू करण्यात यावा. पालकांनी देखील आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवावे आणि अशा घटना पुन्हा होणार नाहीत.
यासाठी एकजुटीने लव जिहाद आणि धर्मांतर कायद्याच्या संदर्भात मागणी करून शासनाला हा कायदा हिवाळी अधिवेशनात पारित करण्यात भाग पाडावे असे आवाहन केले. यावेळी हिमायतनगर शहरातील सर्व शिक्षण संस्थेतील विद्यार्थी विद्यार्थिनी शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि सर्व हिंदू सकल महिला पुरुष बांधव उपस्थित झाले होते. त्यानंतर श्रद्धा वालकर यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून सर्व उपस्थितानी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली त्यानंतर रैलीचा समारोप करण्यात आला. दरम्यान मोर्चा आंदोलन काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक बि.डी .भुसनर यांनी चौक पोलीस बंदोबस्त लावला होता. या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी आफताबला तात्काळ फाशी द्या लव्हजिहादचा जाहीर निषेध, यासह विवीध प्रकारचे फलक हाती घेऊन शालेय विद्यार्थ्यांनी या रॅलीत सहभागी झाले होते. त्यानंतर सहभागी झालेल्या युतीने तहसीलदार ताडेवाड याना मागण्याचे निवेदन दिले
