देगलूर ( वार्ताहर)काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे सोमवारी रात्री देगलूरात अभूतपूर्व स्वागत करण्यात आले . स्वागतानंतर लागलीच राहुल गांधी यांनी देगलूर ते वन्नाळी गुरुद्वारापर्यंत मशाल पदयात्रा काढली व गुरुद्वारात जाऊन दर्शन घेतले. . पुन्हा परत येऊन मुक्काम स्थळी आराम केले.
मंगळवार दि. 8 नोव्हेंबर रोजी सकाळी पावणे नऊच्या सुमारास मुक्काम स्थळावरून निघून वनाळी, वझरगा मार्गावरून आटकळी येथे दुपारी पोहचले.
सदरील पदयात्रा मार्गस्थ होत असताना वझरग्याच्या समोर नागपूर काँग्रेसचे वरिष्ठ नेते व सेवा दलचे राष्ट्रीय पदाधिकारी कृष्णकुमार पांडे यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्या अनुषंगाने येथील आयोजित कार्यक्रम रद्द करून राहुल गांधी यांनी पांडे यांचे अंतिम दर्शन घेतले. पांडे यांचा मृतदेह नागपूरकडे पाठवून काही तासानंतर राहुल गांधी यांनी आपली पदयात्रा भोपाळ ,शंकर नगर कडे मार्गस्थ केली आहे.
सदरील पदयात्रा मार्गस्थ होत असताना रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची अलोट गर्दी उसळली होती.
