नायगाव प्रतिनिधी /महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये नेले, एअरबसचा प्रकल्पही असाच गुजरातमध्ये अचानक गेला .हे कुणालाही कळले नाही. वेदांता फॉक्सकाॅनचा प्रकल्पही गेला. लाखो कोटी रुपयाची गुंतवणूकही गेली. व महाराष्ट्रातील तरुणांचे रोजगारही नरेंद्र मोदींनी हिरावून घेतले आहेत. असा घनाघाती हल्लाबोल राहुल गांधी यांनी कुष्णूर एमआयडीसी येथील सभेत केलाय.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा नायगावहून कुष्णूर एमआयडीसी येथे निघाली असता ,बरबडा सर्कलमधून काँग्रेसचे बालाजी मदेवाड यांनी जवळपास 50 वाहनातून शेकडो कार्यकर्त्यांना सभेसाठी नेले. राहुल गांधी यांचे सभास्थानी आगमन होताच हजारो कार्यकर्त्यांच्या जनसमुदायाने त्यांचे स्वागत केले. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के .सी .वेणू गोपाल, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ,माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे, संजय निरूपम, मुंबई काँग्रेसचे भाई जगताप, माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्यासह बालाजी मदेवाड, रवींद्र पाटील चव्हाण ,श्रीनिवास चव्हाण, मनोज पाटील मोरे, संजय बेळगे, विजय पाटील चव्हाण यांच्यासहसेकडून काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. कन्याकुमारी येथून दोन महिन्यापूर्वी भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली असून, ही यात्रा जम्मू काश्मीर पर्यंत जाणार आहे. या यात्रेला कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही आंधी आये तुफान आये तो भी ये यात्रा शुरू रहेगी ! अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कुष्णूर येथे जाहीर सभेत विश्वास व्यक्त केला.व पूढे म्हणाले की, कुणालाही घाबरू नका ,मनातील भीती काढून टाका .जो ही भीती घालवेल तो द्वेष पसरवू शकत नाही. म्हणून मनातून भीती काढून टाका, असे आवाहन त्यावेळी राहुल गांधी यांनी केले. विविध ठिकाणी पारंपारिक गायनाने राहुल गांधी यांचे स्वागत केले आहे.
