गुंतेदाराच्या निष्काळजीपणा मुळे अनेक गावातील डी.पी.ची दुरावस्था- अधिकारी गुंतेदाराच्या संगनमताने कामाच्या दर्जाची विल्हेवाट- गोपतवाड

हिमायतनगर प्रतिनिधी/ तालुक्यातील शेतावरच्या ट्रान्सफॉर्मर ची अवस्था काय असेल त्याचा विचार न केलेला बरा, गावातील ट्रान्सफॉर्मर च्या खालील फ्युजची भयावह अवस्था आहे.सर्व उघड्यावर असल्यामुळे एखादा फ्युज रात्री बेरात्री गेला एकही लाईनमन मुख्यालयी राहत नसल्याने गावकऱ्यांना रात्र अंधारात काढावी लागत असल्याची वास्तविकता आहे. अनेक गावांत फ्युज म्हणजे उघडे तारच आहेत.केबल देखील हलक्या दर्जाचा असल्यामुळे वारंवार जळुन जात आहे.
भोकर विभागाला कार्यकारी अभियंता संजीवकुमार चितळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता अनुपकुमार तंबाके कर्तव्यदक्ष लाभले असले तरी स्थानिक अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने गुतेदार मनमानी कारभार करुन साहित्य निवीदे नुसार पुरवठा करीत नसले तरी बिल मात्र निविदे प्रमाणेच मिळत असल्याने गुतेदाराचे फावत आहे.गावागावात जीव घेण्या अवस्थेत डि पि असल्यामुळे गावपातळीवर काम करणाऱ्यांचे जीव धोक्यात आहे.स्थानिक उपकार्यकारी अभियंता, सहायक अभियंता मायेपोटी गुतेदाराना अभय देत असल्याने गुतेदाराचे फावत आहे.
कार्यकारी अभियंता चितळे यांनी सवना ज सह काही गावांना फेरफटका मारला तर स्थानिक अधिकाऱ्यांसह लाईनमेन च्या कामांची पध्दत आणि गुतेदाराचा पराक्रम ऊघड होऊ शकते.भविष्यात जीव हानी होऊ नये यासाठी संबंधित गुतेदाराना आपल्या भाषेत समज देऊन दुर्लक्ष अधिका-याना वर्गाचा समाचार घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

अधिकारी गुंतेदाराच्या संगनमताने कामाच्या दर्जाची विल्हेवाटगोपतवाड
 सवना ज अनेक गावच्या ट्रान्सफॉर्मर ची दुरावस्था झाली आहे.हिमायतनगरे सहायक अभियंता, उपकार्यकारी अभियंता यांच्या शी गुतेदाराशी आपुलकी चे संबंध असल्यामुळे अंदाज पत्रकाला वेशीला टांगुन काम होत असल्याने अनेक ट्रान्सफॉर्मर खालील किटकॅट सह डब्यांची दुरावस्था असुन अनेक गावातील, शेतातील विजेच्या तारा झोका घेत आहेत.कर्तव्यदक्ष कार्यकारी अभियंता संजीवकुमार चितळे यांनी लक्ष घालून अंदाज पत्रक समोर ठेवून बिल अदा केलेल्या कामाची पाहणी केल्यास भ्रष्ट अधिकाऱ्यासह गुतेदाराचे पितळ उघडे पडू शकते असा आरोप सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष परमेश्वर गोपतवाड यांनी केला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.